उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. देवश्री रंजीत प्रसाद ही या पिढीतील एक आहे !
आषाढ शुक्ल चतुर्थी (२२.६.२०२३) या दिवशी कु. देवश्री रंजीत प्रसाद हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिची आई आणि आत्या यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘वर्ष २०२० मध्ये ‘कु. देवश्री रंजीत प्रसाद महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२१.६.२०२३) |
कु. देवश्री रंजीत प्रसाद हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. प्रेमभाव
अ. ‘घरात पाहुणे आल्यास कु. देवश्री त्यांच्याशी प्रेमाने बोलते.
आ. एकदा देवश्री तिच्या मावशीच्या घरी २ दिवस राहिली होती. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तू मला सोडून तेथे कशी काय राहिलीस ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘आपल्यामध्ये प्रेमभाव असेल, तर आपण कुठेही राहू शकतो.’’
२. समंजस
अ. तिला काही सांगितल्यास ती लगेच ऐकते. तिला काही अयोग्य करण्यापासून रोखले, तर ती त्वरित थांबते.
आ. गेल्या वर्षी डिसेंबर मासात मी साधनावृद्धी शिबिरात सहभागी झाले होते. तेव्हा देवश्री माझ्या समवेत होती. तिला समजावून सांगितल्यावर ती आश्रमात राहिली आणि मी निश्चिंत होऊन शिबिरात सहभागी होऊ शकले.
इ. एकदा एका उत्सवाच्या वेळी बरीच भांडी घासायची होती. तेव्हा माझी चिडचिड होत होती. मी ती सेवा करायला सिद्ध नव्हते. तेव्हा देवश्रीने मला सांगितले, ‘‘आई, तू भांड्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केलीस, तर तुझी चिडचिड होणार नाही.’’
– सौ. आशा रंजीत प्रसाद (कु. देवश्रीची आई), गया, बिहार.
३. धर्माचरण करण्याची आवड
अ. ‘एकदा देवश्रीला तिच्या आईने सांगितले, ‘‘केक कापून वाढदिवस साजरा करू नये.’’ काही दिवसांनंतर देवश्री तिच्या वडिलांच्या समवेत एका परिचितांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. तेथे तिने पाहिले, ‘केक कापत आहेत.’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘वाढदिवस केक कापून साजरा करू नये. वाढदिवसाच्या दिवशी औक्षण करावे.’’
आ. तिच्या शाळेत २५ डिसेंबरनिमित्त कार्यक्रम होणार होता. दुसर्या दिवशी शाळेत तिला ‘सांताक्लॉज’ बनून जायचे होते. तिने आम्हाला सांगितले, ‘‘मी विदुषकाप्रमाणे (जोकरप्रमाणे) पोशाख करून शाळेत का जाऊ ?’’ तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तू असे का सांगितले ?’’ त्या वेळी तिने सांगितले, ‘‘मी हिंदु आहे. ईसाई नाही. मग मी ईसाईसारखे आचरण का करू ?’’ तिची ही दृढनिष्ठा पाहून माझ्या लक्षात आले, ‘दैवी बालकांची बुद्धी प्रगल्भ असते आणि कृती करण्यासाठी त्यांच्यामध्ये सुस्पष्टता असते.’
ईश्वराने अशा दैवी बालकाकडून मला शिकण्याची संधी दिली, त्याबद्दल त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! गुरुदेवा, आपणच देवश्रीकडून साधनेचे प्रयत्न करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. सानिका संजय सिंह (कु. देवश्रीची आत्या) वाराणसी आश्रम (५.२.२०२२)
इ. ‘सण-उत्सवाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये ?’, याविषयी तिला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.
४. धर्माभिमान
४ अ. हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी न करणे
१. देवश्रीचे वडील घेत असलेल्या धर्मशिक्षण वर्गातील विषय ती लक्ष देऊन ऐकते. तिला ‘हलाल जिहाद’ याविषयी समजल्यापासून तिला हलाल प्रमाणित (टीप) उत्पादनांविषयी पुष्कळ चीड आहे. तिला हल्दीराम आस्थापनाचे भुजिया पुष्कळच आवडत होते; परंतु जेव्हापासून तिला समजले की, ते हलाल उत्पादन आहे. तेव्हापासून तिला ते खाणे आवडेनासे झाले. ती सर्वांना सांगते, ‘‘ते हलाल उत्पादन आहे.’’ (टीप : इस्लामनुसार हलाल म्हणजे जे वैध आहे, ते. पूर्वी हलाल हे केवळ मांसापुरते मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना हलाल प्रमाणपत्र थोेडक्यात ते इस्लामनुसार प्रमाणित आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हटले जाते. देशाला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभाण्याचा हा कट आहे.)
२. एकदा आधुनिक वैद्यांनी तिच्यासाठी लिहून दिलेले औषध ‘ऑनलाईन’ मागवायचे होते. ते औषध आल्यावर ती म्हणाली, ‘‘ते औषध हलाल प्रमाणित नाही ना’, याची निश्चिती करा.’’ तिला ‘ते औषध हलाल प्रमाणित आहे’, असे समजल्यावर तिने ते औषध त्वरित परत करायला लावले.
५. सेवेप्रती भाव
५ अ. बालसंस्कार वर्गात प्रार्थना आणि कृतज्ञता सांगण्याची सेवा करणे अन् झोप लागल्याने एका वर्गात प्रार्थना आणि कृतज्ञता सांगू न शकल्याने पश्चात्ताप होऊन रडू येणे : देवश्री रविवारी होणार्या बालसंस्कार वर्गात प्रार्थना आणि कृतज्ञता सांगण्याची सेवा करते. रविवारी प्रत्येक अर्ध्या घंट्यानंतर ती ‘किती वाजले ?’, असे विचारत असते. ती ‘माझ्याकडून एकदा प्रार्थना करून घ्या, श्लोक म्हणून घ्या’, असे पुनःपुन्हा सांगत असते. एका रविवारी ती बालसंस्कारवर्ग आरंभ होण्याआधी झोपली. बालसंस्कारवर्ग आरंभ झाल्यावर १० मिनिटानंतर ती ‘वेळ झाली का ?’, असे म्हणतच उठली. तिला ‘वर्ग आरंभ झाला आहे’, असे समजल्यावर तिच्याकडून प्रार्थना करण्याची सेवा न झाल्यामुळे तिला पुष्कळ पश्चात्ताप झाला आणि ती रडू लागली.
६. भाव
६ अ. देवाप्रती भाव : तिला सकाळी वेळ मिळाल्यास ती पूजेसाठी फुले आणते. तिला ‘कोणत्या देवाला कोणते फूल वहातात ?’, हे ठाऊक आहे. ती स्वतःहून फुलांची भावपूर्ण सजावट करते.
६ आ. भक्तीसत्संगाप्रती भाव : प्रत्येक गुरुवारी रात्री भक्तीसत्संग ऐकण्यासाठी ती जागी रहाते. भक्तीसत्संगात लावलेल्या भजनांवर ती कधी कधी भावपूर्ण नृत्य करते.
६ इ. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती भाव : मागील वर्षी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ आमच्या घरी आले होते. तेव्हा देवश्री त्यांच्याशी बराच वेळ बोलत होती. ती शाळेतून आल्यानंतर धावतच सद़्गुरु दादांकडे जात होती. ती आम्हाला सांगत असे, ‘‘सद़्गुरु दादा साक्षात् गुरुदेवच आहेत. मला त्यांच्याशी बोलायला पुष्कळ आवडते.’’
६ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव
१. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहून तिला जाणवते, ‘ती रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात या पूर्वीच आली आहे.’ ती आम्हाला पुनःपुन्हा सांगते, ‘‘मला लवकर गुरुदेवांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) घेऊन चला.’’ गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव ‘ऑनलाईन’ पहात असतांना तिने सांगितले, ‘‘आपण आताच आश्रमात रहायला जाऊया.’’
७. देवश्रीमधील स्वभावदोष
अव्यवस्थितपणा आणि हट्टी’
– सौ. आशा रंजीत प्रसाद (सर्व सूत्रांचा दिनांक : २०.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |