पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ !
छतरपूर (मध्यप्रदेश) – येथील बागेश्वर धाममध्ये अवैध शस्त्र घेऊन घुसलेल्या रज्जन खान या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
#BreakingNow: बागेश्वर धाम में टली बड़ी वारदात, पुलिस ने कट्टे के साथ रज्जन खान को किया अरेस्ट
संवाददाता @makarandkale दे रहे हैं पूरी जानकारी@spbhattacharya #BageshwarDham #Crime #DhirendraShastri pic.twitter.com/IFUgyCRswT
— Times Now Navbharat (@TNNavbharat) June 20, 2023
येथे काही भाविक प्रदक्षिणा घालत असतांना एक तरुण हातात देशी पिस्तूल घेतलेला दिला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस येथे आले असता त्यांना पाहून रज्जन खान पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. तो शिवपुरी येथील इंद्रपुरी संकुलात रहाणारा आहे. तो येथे का आला होता ?, याची चौकशी पोलीस करत आहेत. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी मध्यप्रदेश सरकारकडून ‘वाय’ श्रेणीची सुरक्षाव्यवस्था यापूर्वीच पुरवण्यात आलेली आहे.
संपादकीय भूमिकाअन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळी एखादा हिंदु कधी शस्त्र घेऊन गेला आणि त्याने काही अनुचित कृत्य केले, अशी घटना कधीही घडलेली नाही; मात्र हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर, तसेच साधू-संतांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे झाल्याच्या असंख्य घटना घडलेल्या आहेत, हे लक्षात घ्या ! |