|
रत्नागिरी – येथील डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., शाखा रत्नागिरी या बँकेतील रोखपालने (कॅशिअरने) बँकेतील १ लाख ६१ सहस्र ५०० रुपये चोरल्याचा प्रकार उघड झाला आहे. अक्षय चंद्रकांत वेशविकर या रोखपालने खर्या नोटांच्या जागी खेळण्यातल्या नोटा ठेवून बँकेची फसवणूक केल्याचे बँकेच्या अंतर्गत तपासणीत उघड झाले. या प्रकरणी बँक व्यवस्थापकांनी तक्रार केल्यानंतर रोखपाल अक्षय वेशविकर याच्या विरोधात पोलिसांनी भा.दं.वि. ४२० नुसार फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
रोखपाल अक्षय याने नोव्हेंबर २०२२ ते ६ जून २०२३ या कालावधीत हा प्रकार केला आहे. त्याने ५०० रुपयांच्या प्रत्येकी १०० नोटांची ४ बंडले, तसेच १० बंडले असलेल्या ‘स्ट्राँग रूम’मधील ‘रिम’मध्ये असलेले एकूण १४ बंडले स्वत:कडे ठेवली. त्याने बँकेतील एकूण १ लाख ६१ सहस्र ५०० रुपयांची चोरी करून ती लपवण्यासाठी त्याने ५०० रुपयांच्या ३२३ लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा ठेवून बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका‘कुंपणच शेत खाते’ ही म्हण सार्थ ठरवणारे बँकेचे रोखपाल ! अशांना कायमचे कारागृहात ठेवले, तरच अशा समस्यांना थोडा तरी आळा बसेल !
|