रक्तदाब वाढत नाही, तसेच हृदयाचे ठोकेही सामान्य रहातात !
न्यूयॉर्क (अमेरिका) – एखाद्या व्यक्तीविषयी कृतज्ञता दर्शवल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या बळकटी मिळते. कृतज्ञता ही एक सकारात्मक भावना आहे. जेव्हा ती निर्माण होते, तेव्हा तुम्ही स्वीकारता की, जीवनात चांगुलपणाही आहे, असे संशोधन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट ए. एमन्स यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासगटाने केले आहे.
विश्वास:छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने मानसिक आरोग्य सुधारते; जीवनात समाधानाची भावना वाढते#lifestyle #satisfaction #MentalHealthAwareness #life https://t.co/9uzeVlWIej
— Divya Marathi (@MarathiDivya) June 15, 2023
या संशोधनानुसार ज्यांच्यात कृतज्ञतेची भावना असते, अशांचा रक्तदाब वाढत नाही, तसेच त्यांच्या हृदयाचे ठोकेही सामान्य रहातात. या संशोधनाच्या अंतर्गत एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये सहभागी असलेल्यांच्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक गोष्टींची आणि त्यांना जाणवलेल्या परिणामांची सूची करून धन्यवाद पत्र लिहिण्यास सांगण्यात आले. परिणामांवरून असे दिसून आले की, अशा प्रकारच्या क्रियांमुळे केवळ मानसिक आरोग्यच लाभत नाही, तर नैराश्य आणि चिंता ही न्यून होते. यासह कृतज्ञता व्यक्त केल्याने दैनंदिन जीवनात आत्मसन्मान वाढण्यासह समाधानाची पातळीही वाढते. नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठातील मानसशास्त्रज्ञ सारा एल्गो म्हणतात, परिचित, मित्र किंवा जोडीदार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने नातेसंबंध दृढ होतात.
संपादकीय भूमिकाकुटुंबीय, सहकारी यांच्याप्रती कृतज्ञ रहाण्यासह भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करत राहिल्यास कृतज्ञतेला आध्यात्मिक आधार लाभून मानसिक आरोग्यासह जीवन आनंदी अन् समाधानी होण्यासही चालना मिळते, हे लक्षात घ्या ! |