तुमची वक्‍तव्‍ये सुधारा, अन्‍यथा लोक तुमचे चित्रपट पहाणे बंद करतील !

अभिनेते मुकेश खन्‍ना यांनी सुनावले हिंदुद्वेष्‍टे नसीरुद्दीन शाह यांना खडे बोल !

नसीरुद्दीन शाह आणि मुकेश खन्ना

मुंबई –  साक्षी, श्रद्धा, अंकिता कांड, कानपूर हनुमान मंदिरातील तोडफोड, हत्‍या अशा घटनांनंतरही ‘या देशात मुसलमान सुरक्षित नाहीत’, असे म्‍हणण्‍याचे धाडस केले जाते. इथे कुणी सुरक्षित नाहीत, तर ते १०० कोटी हिंदू. तुम्‍ही खूपच कट्टर झाला आहात. हे कलाकाराला शोभणारे नाही. असे असेल, तर तुम्‍हीही ‘लव्‍ह जिहाद टीम’च्‍या प्रसार करणार्‍या गटातील आहात. विचार तुम्‍हाला करायचा आहे. नाहीतर लोक तुमचे चित्रपट पहाणे बंद करतील, त्‍यामुळे तुमची माहिती आणि तुम्‍ही केलेली वक्‍तव्‍ये सुधारा, असे खडे बोल चित्रपट अभिनेते मुकेश खन्‍ना यांनी सातत्‍याने हिंदूंविरुद्ध वक्‍तव्‍ये करणारे नसीरुद्दीन शाह यांना सुनावले आहेत.

काही दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह यांनी ‘द काश्‍मीर फाईल्‍स’ चित्रपटाचा नामोल्लेख न करता मोदी सरकारवर टीका केली होती. अलीकडेच शाह म्‍हणाले होते, ‘‘मुसलमानांचा द्वेष करणे ही ‘फॅशन’ (टूम) झाली आहे. एखाद्या विशिष्‍ट विचारधारेचा प्रचार करण्‍यासाठी चित्रपटांचा वापर केला जातो.’’ (गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटांतून सातत्‍याने हिंदु देवता, धर्म, संत, श्रद्धास्‍थाने यांवर आघात करण्‍यात आले, तेव्‍हा ‘विशिष्‍ट विचारधारा प्रसार करत आहे’, असे शहा यांना वाटले नाही का ? आता हिंदूंनी त्‍यांच्‍यावरील अन्‍याय मांडणे चालू केले, तर शहा यांच्‍या पोटात का दुखते ? – संपादक)

१४० कोटी हिंदूंमध्‍ये एकता नसल्‍याने ते सुरक्षित नाहीत ! – मुकेश खन्‍ना

‘रस्‍त्‍यावरून चालतांना भीती वाटते की, कुणी येऊन मुलांना त्‍यांचा धर्म कोणता ? असे विचारेल’, असे विधान नसीरुद्दीन शाह यांनी वर्ष २०१८ मध्‍ये केले होते. या वक्‍तव्‍याचा संदर्भ देऊन मुकेश खन्‍ना यांनी म्‍हटले आहे, ‘‘या जगात कुणीच सुरक्षित नाही; पण एक विचार करण्‍यासारखी गोष्‍ट आहे, ती म्‍हणजेे संपूर्ण जगात मुसलमानच सुरक्षित आहेत. कृपा करून ‘मुसलमान सुरक्षित नाहीत’, अशी विधाने करू नका. इथे असुरक्षित आहेत ते हिंदू. त्‍यांच्‍या चुकांमुळे नाही, तर त्‍यांच्‍यात एकता नसल्‍याने ! १४० कोटी हिंदू आज सुरक्षित नाहीत. आपल्‍याला बाहेरच्‍या लोकांकडून भीती असायला हवी; परंतु आपल्‍यातीलच काही लोक आपापसांत धर्माच्‍या नावावर द्वेष, भीती पसरवत आहेत.’’