आष्टी (जिल्हा बीड) येथे औरंगजेबाचे ‘स्टेटस’ ठेवल्याच्या प्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पाळण्यात आला बंद

आष्टी (जिल्हा बीड) – शहरातील आझादनगरमध्ये जैद अय्युद सय्यद याने औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने ८ जूनच्या रात्री तणाव निर्माण झाला होता. रात्री विलंबाने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेमुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आवाहनानंतर ९ जून या दिवशी शहरात बंद पाळण्यात आला. ‘औरंगजेबाला उद्देशून ‘बाप तो बाप रहेगा’ अशा आशयाचे वाक्य लिहून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवत २ समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केले’, अशी तक्रार शुभम लोखंडे यांनी आष्टी पोलीस ठाणे येथे नोंदवली होती. त्यानंतर जैद अय्युद सय्यद याच्या विरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले, तसेच कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संपादकीय भूमिका

  • महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये असे प्रकार घडणे, हा हिंदूंविरुद्ध एका मोठ्या षड्यंत्राचा भाग नाही ना, याचा शोध राज्य सरकार घेईल का ?
  • धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळेच ते असे प्रकार करून हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करतात !