लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधाने ठेवले टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे ‘स्टेटस’

धर्मांधावर कारवाई करण्याची विविध संघटनांची पोलिसांकडे मागणी

(‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले चित्र किंवा लिखाण)

एमाननुरी अहमद वकील उजीजने ‘इन्स्टाग्राम’वर क्रूरकर्मा टिपू सुलतानचे स्टेटस ठेवून त्याचे केले उदात्तीकरण !

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

लांजा, ८ जून (वार्ता.) – शिवराज्याभिषेकदिनी अहिल्यानगर (नगर) आणि कोल्हापूर या शहरांत क्रूरकर्मा औरंगजेब अन् टिपू सुलतान या हिंदुद्वेष्ट्या आक्रमकांच्या उदात्तीकरणाच्या घटना ताज्या असतांनाच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरातही एका धर्मांधाने ‘इन्स्टाग्राम’वर क्रूरकर्मा टिपू सुलतानचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याचे समोर आले आहे. एमाननुरी अहमद वकील उजीज उपाख्य मौलू असे या धर्मांधाचे नाव आहे. त्याचा शहरात होत असलेल्या गांजाविक्रीच्या प्रकरणातही हात आहे. एमाननुरी याच्या या कृत्यामुळे शहरातील हिंदू संतप्त झाले. त्यामुळे येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक अट्टुगडे यांची भेट घेत त्यांच्याकडे ‘धर्माध आरोपीवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली.

पोलीस निरीक्षक अट्टुगडे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी हिंदू

पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोल्हापूर येथे चालू असलेल्या प्रकरणाचा विचार करता अशा प्रकारे उदात्तीकरण केल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. अशा उदात्तीकरणामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होत आहे. एमाननुरी अहमद वकील उजीज याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

आरोपीच्या अटकेऐवजी पोलिसांकडून त्याला लांजा शहर कायमस्वरूपी सोडून जाण्याचा आदेश !

हा प्रकार म्हणजे ‘दुसर्‍या ठिकाणी जाऊन असेच गुन्हे कर’, यासाठी पोलिसांनी दिलेली मोकळीकच नव्हे का ?

नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अट्टूगडे यांनी एमाननुरी अहमद वकील उजीज या आरोपीला, तसेच त्याचा भाऊ आणि राजापूर येथील त्याचे वडील यांना पोलीस ठाण्यात तातडीने बोलावून घेतले. या वेळी आरोपीकडून ‘यापुढे माझ्याकडून अशा तर्‍हेचे चुकीचे आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे वर्तन होणार नाही’, असे लिहून घेण्यात आले. (असे लिहून घेऊन वर्तन सुधारण्याइतका पोलिसांचा धाक धर्मांधांना राहिला आहे का ? असे लिहून घेतल्याने धर्मांध पुन्हा गुन्हा करणार नाहीत, याची पोलिसांना तर निश्‍चिती आहे का ? – संपादक) या वेळी आरोपीला यापुढे लांजा येथून कायमस्वरूपी निघून जाण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे. (हा प्रकार म्हणजे पोलिसांनी गुन्हेगाराला अप्रत्यक्ष दिलेले अभयच नव्हे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • अशी मागणी पोलिसांकडे का करावी लागते ? पोलीस स्वत:हून अशांवर कारवाई का करत नाहीत ?
  • महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या एका पाठोपाठ एक घडलेल्या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे सुनियोजित षड्यंत्रच म्हणावे लागेल ! समाजात शांतता राखण्यासाठी सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !