अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २ धर्मांधाकडून हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे २ धर्मांधांनी नोकरीचे आमीष दाखवून एका हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रेहान उपाख्य फुरकान याने स्वत:चे नाव ‘निहाल चौधरी’ असल्याचे सांगून हिंदु महिलेची फसवणूक केली. रेहानवर त्याच्या एका मुसलमान साथीदारासह पीडित महिलेवर ७ मास सामूहिक बलात्कार केल्याचा आणि नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ७ मार्च या दिवशी रेहानला अटक केली.

पीडित हिंदु महिलेने प्रसारमाध्यमांना सांगितले …

१. मी विधवा असून चांगली नोकरी शोधत होती. रेहानशी ७ मासांपूर्वी माझी फेसबुकवर ओळख झाली. रेहानने ‘निहाल चौधरी’ या हिंदु नावाने फेसबुक खाते बनवले होते. रेहानने मला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमीष दाखवले. रेहानच्या आमिषाला मी बळी पडले.

२. रेहानने मला मुलाखतीच्या नावाखाली भेटण्यासाठी बोलावले. कार्यालय असल्याचे सांगून त्याने मला एका घरात बोलावले होते. तेथे रेहान आणि त्याचा साथीदार याने मला नशेचे पदार्थ पाजून माझ्यावर बलात्कार केला. या वेळी दोघांनी माझा अश्‍लील व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ प्रसारित करण्याची भीती दाखवून रेहान आणि त्याचा साथीदार ७ मास माझ्यावर बलात्कार करत राहिले.

३. मी हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी संपर्क साधून त्यांच्या साहाय्याने आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका

अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशी दिल्यास असले प्रकार थांबतील !