भारताचे सैन्यदल प्रमुख मनोज पांडे यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट

डावीकडून शेख हसीना आणि जनरल मनोज पांडे

ढाका (बांगलादेश) – भारताच्या सैन्यदलाचे प्रमुख जनरल मनोज पांडे २ दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यावर आहेत. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘दोन्ही देशांच्या सैन्याने त्यांच्यातील सहकार्य  अधिक भक्कम केले पाहिजे’, असे आवाहन केले. तसेच त्यांनी द्विपक्षीय सहकार्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांती मोहिमांमध्ये भागीदारी करण्याचीही सूचना केली. जनरल मनोज पांडे यांनी या वेळी बांगलादेशाच्या सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी भारताचे सहकार्य चालू राहील, असे स्पष्ट केले.