उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा !

काँग्रेसचे नेते अवधेश राय यांच्या वर्ष १९९१ मध्ये झालेल्या हत्येचे प्रकरण

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी आणि हत्या झालेले काँग्रेसचे नेते अवधेश राय

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काँग्रेसचे नेते अवधेश राय यांच्या हत्येच्या प्रकरणी कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठवली. ही हत्या ३२ वर्षांपूर्वी, म्हणजे ३ अ‍ॅगस्ट १९९१ या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यात मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश, माजी आमदार अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. यांतील अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.

मुख्तार अन्सारी याला गाजीपूर येथे पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि काही जणांच्या हत्येच्या प्रकरणी वर्ष २०२२ मध्ये १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासह कारागृहाच्या अधीक्षकांना पिस्तूलद्वारे धमकावल्याच्या प्रकरणी अन्सारी याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. (अशा आरोपीला फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक होते, असेच जनतेला वाटते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

३२ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच होत ! हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !