भारताने १४ भ्रमणभाष अ‍ॅप्सवर घातली बंदी !

जिहादी आतंकवादी करत होते वापर !

नवी देहली – केंद्रशासनाने संदेशांसाठी वापर करण्यात येणार्‍या १४ भ्रमणभाष अ‍ॅप्स वर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्सचा वापर भारतातील जिहादी आतंकवादी  पाकिस्तानमधील त्यांच्या प्रमुख आतंकवाद्यांकडून संदेश मिळवण्यासाठी करत होते.

जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी गट या अ‍ॅप्सचा वापर करत होते. केंद्रशासनाने यापूर्वी चिनच्या ‘टिकटॉक’सह अनुमाने २०० अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.