रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात बासरीचे सूर कानी पडल्यावर शांत वाटून मन एकाग्र होणे आणि जीवनात प्रथमच संगीताचा इतका आनंद अनुभवता येणे

श्रीमती गीता प्रभु

‘मी सकाळी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असतांना बासरीचे सूर माझ्या कानी पडले. मला संगीताचे काही ज्ञान नाही, तरीही ते सूर ऐकून माझे डोळे आपोआप बंद झाले. ते ऐकत असतांना मला पुष्कळ शांत वाटत होते. माझे मन एकाग्र झाले होते. एरव्ही माझ्या मनात अनेक विचार असल्याने माझे मन अस्थिर असते; परंतु ते सूर ऐकतांना मन स्थिर झाले होते. मला २० ते ३० मिनिटे त्या सुरांचा गुंजारव जाणवत होता. जीवनात प्रथमच मला संगीताचा इतका आनंद अनुभवता आला.

मला हे दैवी संगीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामुळे ऐकायला मिळाले. त्याबद्दल मी त्यांच्या कोमल चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.९.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक