उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. अर्णव म्हैसकर हा या पिढीतील एक आहे !
(अर्णव म्हणजे समुद्र, महासागर)
१०.८.२०२२ या दिवशी चि. अर्णव पुष्कर म्हैसकर याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या वडिलांनी अर्णवच्या गर्भारपणाच्या वेळी त्याच्या आईला झालेले त्रास, वेळोवेळी संतांचे मिळालेले साहाय्य आणि कुटुंबियांनी सांगितलेली चि. अर्णवची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. पत्नी सौ. अनुश्री हिच्या गर्भारपणात जाणवलेली सूत्रे
१ अ. पुणे येथील मित्र आयुर्वेदाचार्य निखिल उदय पेंडसे यांनी नाडीपरीक्षणाद्वारे केलेले अचूक निदान ! : ‘जानेवारी २०२१ मध्ये आम्ही (मी आणि पत्नी सौ. अनुश्री) पुणे येथील वैद्य पेंडसे यांना सौ. अनुश्रीची प्रकृती दाखवण्यासाठी गेलो. तिचे नाडीपरीक्षण करून ते म्हणाले, ‘‘ती गरोदर आहे आणि ही प्रसुती होणे आवश्यक आहे; कारण तिच्यासाठी दुसरी प्रसुती धोक्याची आहे. या वेळची प्रसुतीही शस्त्रकर्माद्वारे करावी लागेल.’’
१ अ १. मारुतिरायांची अनुभवलेली कृपा !
१ अ १ अ. ‘ज्योतिषाचार्य स्नेही यांनी भ्रमणभाष करून प्रत्यक्ष हनुमंत गर्भाचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जवळ आहे’, असे सांगणे : अनुश्री गरोदर असतांना माझ्या पुणे येथील ज्योतिषाचार्य स्नेह्यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘प्रत्यक्ष हनुमंत गर्भाचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जवळ आहे.’’
१ अ १ आ. घराजवळ कधी वानर न येणे; मात्र प.पू. दास महाराज यांच्याशी बोलतांना तिथे वानर येणे, त्या संदर्भात प.पू. महाराज यांनी ‘प्रत्यक्ष मारुतिराय आले आहेत’, असे सांगणे : त्याच दिवशी प.पू. दास महाराज यांनी मला हनुमंतांचा नामजप करायला सांगितला. मी प.पू. दास महाराज यांच्याशी भ्रमणभाषवर बोलत असतांना एक वानर तिथे येऊन आम्ही रहात असलेल्या घराकडे पुष्कळ वेळ एकटक पहात होते. आम्ही रहात असलेल्या ठिकाणी सपाट माळ असल्याने (झाडे नसल्याने) मागील ८ वर्षांत तिथे कधी वानर आले नाहीत. हे मी प.पू. दास महाराज यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष मारुतिराय आले आहेत.’’
१ आ. आधुनिक वैद्यांनी ‘गर्भाची वाढ नीट होत नसल्याने प्रत्येक आठवड्याला ‘सोनोग्राफी’ करावी लागेल’, असे सांगणे : वैद्य पेंडसे यांनी सौ. अनुश्रीला त्यांचे स्नेही आधुनिक वैद्या (सौ.) मुक्ता उमर्जी यांच्याकडे दाखवण्यास सांगितले. विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा आधुनिक वैद्य चिन्मय उमर्जी यांनी अनुश्री हिची ‘थ्रीडी सोनोग्राफी’ (विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी) करून सांगितले, ‘‘गर्भाची वाढ व्यवस्थित झालेली नाही. गर्भाची स्थिती पाहून ‘प्रत्येक आठवड्याला ‘सोनोेग्राफी’ करावी लागेल.’’
१ इ. योगासने आणि प्राणायाम करणे : गर्भाला रक्त आणि प्राणवायू यांचा पुरवठा अल्प होत असल्याने आधुनिक वैद्यांनी अनुश्रीला योगासने अन् प्राणायाम करायला सांगितले.
१ ई. गर्भारपणाच्या काळात सौ. अनुश्रीला झालेले त्रास आणि अनुभवलेली संतांंची अपार कृपा !
१ ई १. प.पू. गगनगिरी महाराज यांनी सांगितलेल्या साधना मार्गानुसार साधना करणार्या वैद्य पेंडसे यांनी केलेले साहाय्य ! : अनुश्रीला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे तिला बर्याच वेळा त्रास व्हायचा. वैद्य पेंडसे यांनी तिचे नाडीपरीक्षण केल्यावर त्यांनाही त्रासदायक शक्ती जाणवून त्यांनी तिला ‘थकवा येणे, गळून जाणे, पेटका येणे’, अशा स्वरूपाचे त्रास होत असल्याचे सांगितले. वैद्य पेंडसे हे प.पू. गगनगिरी महाराज यांनी सांगितलेल्या साधनामार्गानुसार उपासना करतात. अनुश्रीला होणारे त्रास न्यून होण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या भस्माच्या ३ पुड्या प्रतिदिन एक याप्रमाणे अनुश्रीच्या उशीखाली ठेवायला दिल्या. पहिल्या दिवशी त्या भस्माचा रंग हलका पिवळसर होता, तो पालटून काळपट होऊन त्याला दुर्गंधी येत होती. पुढील दोन दिवसांत पुड्यांमधील भस्माचा रंग आणि दुर्गंधी न्यून झाली.
१ ई २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा ! : बाळाची वाढ नीट होत नव्हती; म्हणून माझ्या एका स्नेह्याने त्यांच्या गुरुजींना ही परिस्थिती सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हा गर्भ अजून जिवंत कसा ? ‘गर्भ राहू नये’, यासाठी अघोरी प्रयोग केला आहे; परंतु त्या गर्भामागे असलेला प्रचंड दैदिप्यमान प्रकाश त्याचे रक्षण करत आहे. त्यामुळे कसलीही काळजी नसावी.’’ त्यावर माझे ज्योतिषाचार्य स्नेही म्हणाले, ‘‘गर्भाच्या मागे श्री गुरूंचे प्रचंड बळ आहे. त्यामुळे त्याला काहीही होणार नाही.’’ हे ऐकल्यावर मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ ई ३. ज्योतिषाचार्य स्नेह्याने गुरुचरित्रातील १४ वा अणि १८ वा अध्याय ११ – ११ वेळा म्हणायला सांगणे आणि हा उपाय करायला सांगितल्यावर त्यांनाही त्रास होणे : २४.६.२०२१ या दिवशी माझे ज्योतिषाचार्य स्नेही अकस्मात् ६० कि.मी. प्रवास करून आम्हाला भेटायला आले. अनुश्रीची नाडी तपासून ते म्हणाले, ‘‘२६ आणि २७ जून या २ दिवशी गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो. ‘गुरुचरित्रातील १४ वा आणि १८ वा हे अध्याय ११ – ११ वेळा वाचा. बाकी मी आता काही बोलणार नाही.’’ त्या रात्री ज्योतिषाचार्य स्नेही यांना ताप येऊन त्यांनाही आध्यात्मिक त्रास झाला.
१ ई ४. नामजपाने नागिणीचा त्रास उणावणे : अनुश्रीला ६ वा मास चालू असतांना तिचा चेहरा आणि ओठ यांवर अकस्मात् नागीण (एक त्वचा विकार) होऊन त्याला ६ मुखे असल्याचे लक्षात आले. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘असे पुष्कळ अपवादाने होते.’’ या वेळी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘हा त्रास अनिष्ट शक्तींमुळे होत आहे’, असे सांगून नामजप सांगितला. त्या नामजपाने तिचा त्रास उणावला.
१ ई ५. गर्भाची हालचाल अकस्मात् बंद होऊन पुन्हा आपोआप चालू होणे : अनुश्रीला ७ वा मास चालू असतांना गुरुवारी अकस्मात् अनुश्रीच्या पोटात तीव्र वेदना होऊन गर्भाची हालचाल बंद झाली. अनुश्रीला रुग्णालयात नेल्यावर देवाच्या कृपेने आपोआप गर्भाची हालचाल पुन्हा चालू झाली. त्या पुढील सलग २ गुरुवारी अनुश्री अकस्मात् बेशुद्ध होत असे.
१ ई ६. प.पू. दास महाराज यांनी आश्वस्त करणे : सातव्या मासापर्यंत गर्भाचे पोट आणि छाती या अवयवांची वाढ न झाल्याने विकलांग बाळ जन्माला येण्याची शक्यता दिसत होती. ही स्थिती नववा मास लागल्यावर पहिल्या ३ दिवसांपर्यंत तशीच होती. मी प.पू. दास महाराज यांना भ्रमणभाष करून ही स्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही काळजी करू नकोस. मारुति अखंड बसलेला आहे. बाळ सुखरूप आणि धष्टपुष्ट जन्माला येईल.’’
१ ई ७. पू. जयराम जोशीआबा यांनी ‘बाळाचा जन्म सुखरूप व्हावा’, यासाठी प्रार्थना करणे : माझे आजोबा पू. जयराम जोशीआजोबा (सनातनचे ५१ वे समष्टी संत, वय ८४ वर्षे, मिरज, माझी आई सौ. आरती म्हैसकर हिचे वडील) हेही ‘बाळाचा जन्म सुखरूप व्हावा’, यासाठी प्रार्थना करत होते.
१ उ. अनुभूती
१ उ १. परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव पहाण्यासाठी गर्भाने अनुश्रीला पोटात ढुशी मारून उठवणे : अनुश्री गरोदर असतांना आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहात होतो. तेव्हा अनुश्रीला झोप लागल्यावर गर्भाने पोटामध्ये ढुशी मारून अनुश्रीला उठवले आणि कार्यक्रम पहायला लावला. कार्यक्रम पहात असतांना गर्भ पोटामध्ये आनंदाने हालचाल करीत होता.
१ उ २. दत्ताचा नामजप करतांना आईला ‘येणारे बाळ दत्तवंशातील आहे’, असे ऐकू येणे : आम्ही या काळात पुणे येथे वास्तव्याला होतो. माझी आई (सौ. आरती प्रसाद म्हैसकर) पू. माईंनी (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी) सांगितल्यानुसार दत्ताचा नामजप करत असे. एकदा ती दत्ताचा नामजप करत असतांना तिला ‘येणारा बालक दत्तवंशातील आहे’, असे ऐकू येऊन बाळाचा चेहरा दिसला. साधारणतः बाळाचा चेहरा तसाच (आईला दिसल्याप्रमाणे) आहे.
१ उ ३. आईला मारुतिस्तोत्र म्हणतांना दारात मारुतिराय हसतांना दिसणे : सतत येणार्या अडथळ्यांच्या निवारणासाठी माझी आई मारुतिस्तोत्र म्हणायची. मारुतिस्तोत्र म्हणतांना एकदा तिला ‘घराच्या दारामध्ये काळ्या रंगाचा वानर आला आहे’, असे दिसले. त्याला पाहून आईला भीती वाटली. तेव्हा लगेच तिला ‘पूर्ण पांढर्या रंगाचा मारुति हसत आहे’, असे दिसले. ‘तो बाळाचे रक्षण करत आहे’, असे तिला जाणवले.
२. प्रसुती
प्रसुतीपूर्वी शेवटच्या १० दिवसांमध्ये गर्भाची आवश्यक ती वाढ झाली. २०.८.२०२१ या दिवशी नवव्या मासात अनुश्रीची शस्त्रकर्म करून प्रसुती करण्यात आली. बाळ सुखरूप जन्माला आले. या संपूर्ण कालावधीत ‘प.पू. दास महाराज आणि ज्योतिषाचार्य मित्र यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टरच आमची काळजी घेत आहेत’, असे मी अनुभवले.
२ अ. संतांनी ‘मारुतिराया आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प्रसुती सुखरूप झाली’, असे सांगणे : या वेळी ज्योतिषाचार्य स्नेही, पू. जयराम जोशीआजोबा आणि प.पू. दास महाराज रुग्णाईत होऊन त्यांना त्रास झाला. तेव्हा ज्योतिषाचार्य स्नेही आणि पू. जोशीआजोबा म्हणाले, ‘‘गुरुकृपेने प्रसुती सुखरूप पार पडली.’’ प.पू. दास महाराज म्हणाले, ‘‘शक्तींनी इतका थयथयाट करूनही मारुतिराया आणि गुरुदेव यांच्या कृपेमुळे बाळ सुखरूप जन्माला आले.’’
२ आ. वैद्य आणि आधुनिक वैद्य यांच्या प्रतिक्रिया
२ आ १. वैद्य पेंडसे : ‘आमच्या (मी आणि माझे वडील) वैद्यक सेवेतील असे हे पहिलेच उदाहरण (केस) आहे.’
२ आ २. आधुनिक वैद्या (सौ.) मुक्ता उमर्जी (वय ७२ वर्षे) : ‘माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवातील हे पहिले उदाहरण (केस) आहे.’
२ आ ३. आधुनिक वैद्य चिन्मय उमर्जी : ‘आमच्या आंतरराष्ट्रीय आधुनिक वैद्यांच्या परिषदेत (कॉन्फरन्समध्ये) अभ्यासासाठी ही ‘केस’ घेण्यात आली आहे.’
३. चि. अर्णव याला जन्मानंतर झालेले त्रास
३ अ. सायंकाळी काळा-निळा होणे : ‘आम्ही पुण्यात असतांना अर्णव सायंकाळी काळा-निळा होत असे. आध्यात्मिक उपाय केल्यावर त्याचा त्रास दूर होत असे.
३ आ. पोट फुगणे : अर्णव २ मासांचा झाल्यावर आम्ही रत्नागिरी येथे परत आलो. तिथे सायंकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत अर्णवचे पोट अकस्मात् फुगायचे.
३ इ. सभोवती पाहून किंचाळणे : तो सभोवती पाहून दचकायचा आणि किंचाळून रडायचा. तो ४ मासांचा होईपर्यंत त्याला हा त्रास होत होता.
३ ई. अष्टमी, पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना त्रास होणे : ज्योतिषाचार्य स्नेही यांनी ‘बाळाला अष्टमी, पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना त्रास होईल’, असे सांगितले होते. त्याप्रमाणे या तिथींना त्याला त्रास व्हायचा. तो चिडचिड करून रडायचा, दचकायचा किंवा मांडीवरून खाली रहायचा नाही. अष्टमीला या त्रासांची तीव्रता अधिक असे.
३ उ. ज्योतिषाचार्य स्नेह्यांनी अर्णवला होणार्या उलटीसाठी सांगितलेला उपाय : त्यानंतर अर्णवला उलटीचा त्रास चालू झाला. तेव्हा मला (श्री. पुष्कर) सलग ६ दिवस एक स्वप्न पडत होते. स्वप्नात एका गावातील बसस्थानकावर एक जोडपे गाडीतून उतरतांना दिसे. त्या जोडप्यातील बाईच्या कडेवर एक छोटे बाळ दिसे. मळकट कपडे अन् अस्ताव्यस्त केस असलेली एक बाई त्या जोडप्याच्या मागे लागत असे. ती त्यांना ‘मला बाळाला दूध पाजायला द्या’, असे म्हणत असे. मी ज्योतिषाचार्य स्नेही यांना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांनी प्रतिदिन दुधाची (बाळ अर्णवला बाहेरचे गाईचे दूध दिले जाते.) दृष्ट काढायला सांगून उतारा ठेवायला सांगितला.
४. सौ. अनुश्रीची परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा बसणे : सौ. अनुश्रीचे शिक्षण इंग्रजी (‘कॉनव्हेंट’) शाळेमध्ये झाले असून तिच्या माहेरी साधनेचे वातावरण नाही, तरीही तिने तिला गरोदरपणात आणि नंतर झालेल्या सर्व त्रासांसाठी सांगितलेले सर्व आध्यात्मिक उपाय केले. या सर्व प्रसंगांतून तिची परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा बसली.’
५. चि. अर्णवचे जाणवलेले गुण
५ अ. जिज्ञासू : ‘त्याला प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा आहे. अनेक वस्तू तो जिज्ञासेने हातात घेऊन पहातो. तो उदबत्तीचा धूर हातात पकडायचा प्रयत्न करतो.’
– श्री. पुष्कर प्रसाद म्हैसकर, सौ. आरती प्रसाद म्हैसकर (अर्णवची आजी (वडिलांची आई)) आणि श्री. प्रसाद श्रीकांत म्हैसकर (अर्णवचे आजोबा (वडिलांचे वडील))
५ आ. सहनशीलता : चि. अर्णव ६ मासांचा असतांना ‘त्याच्या गुदद्वाराला कात्रे पडणे, शौचाला खडा होणे, ताप येणे, अंगावर फोड येऊन त्याची आग होऊन त्याला खाज सुटणे’, असे त्रास होऊनही त्याने ते शांतपणे सहन केले. तो पुष्कळ सहनशील आहे.’
– श्री. पुष्कर प्रसाद म्हैसकर, सौ. अनुश्री पुष्कर म्हैसकर (अर्णवची आई) आणि सौ. आरती प्रसाद म्हैसकर
५ इ. देवाची ओढ : ‘चि. अर्णव झोपतांना कृष्णाचा पाळणा ऐकल्यावरच झोपतो.’
– सौ. अनुश्री पुष्कर म्हैसकर
५ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेली ओढ : ‘आम्ही दुसर्या खोलीमध्ये असतांना अर्णवला ‘परम पूज्य कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर तो सर्वत्र परम पूज्यांचे छायाचित्र शोधतो.’
– सौ. आरती प्रसाद म्हैसकर आणि सौ. अनुश्री पुष्कर म्हैसकर.
६. चि. अर्णवची जाणवलेली वैशिष्ट्ये
६ अ. अंगावर दैवी कण दिसणे : ‘चि. अर्णवचा जन्म झाल्यापासून २ मासांपर्यंत त्याचे संपूर्ण अंग तेजस्वी (कांतीमान) दिसायचे. त्याच्या संपूर्ण अंगावर काही वेळा चंदेरी, तर काही वेळा सोनेरी रंगाचे दैवी कण दिसायचे.’
– श्री. पुष्कर म्हैसकर, सौ. अनुश्री पुष्कर म्हैसकर, श्री. प्रसाद म्हैसकर आणि सौ. आरती प्रसाद म्हैसकर
६ आ. विविध मुद्रा करणे : ‘अनेकदा त्याच्या हाताच्या बोटांची एका हाताच्या तर्जनीने सुदर्शन चक्र घेतल्याप्रमाणे आणि दुसर्या हाताने पाशांकुश घेतल्याप्रमाणे मुद्रा केलेली असते.’
– सौ. अनुश्री पुष्कर म्हैसकर
६ इ. सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने जाणवणे : ‘चि. अर्णवला सकारात्मक अथवा नकारात्मक स्पंदने जाणवतात’, असे माझ्या लक्षात आले. तो पाळण्यात झोपला असतांना कुणी त्या खोलीमध्ये अलगद गेले, तरी तो पाळण्यामध्ये झोपेतही त्या व्यक्तीच्या स्पंदनांनुसार हालचाल करायचा. त्याच्या आईला आध्यात्मिक त्रास होत असतांना तो तिच्याकडे जाणे टाळतो. तो काही विशिष्ट व्यक्तींकडे बघून रडतो.’ – श्री. प्रसाद श्रीकांत म्हैसकर
६ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून हसणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर तो देवघरातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडेे बघून हसतो.’
– सौ. अनुश्री पुष्कर म्हैसकर
६ उ. प.पू. भक्तराज महाराज किंवा प.पू. रामानंद महाराज यांच्या छायाचित्रांकडे पाहून आनंद व्यक्त करणे : ‘तो सनातनच्या पंचांगावरील देवतांची चित्रे शांतपणे पहातो; परंतु प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून आनंदाने हसतो आणि प.पू. रामानंद महाराज यांचे छायाचित्र पाहून आनंदाने हसून त्यांच्या गालाला हात लावायला पुढे झुकतो.’
– श्री. प्रसाद श्रीकांत म्हैसकर
७. संतांनी बाळाविषयी काढलेले उद़्गार !
७ अ. ज्योतिषाचार्य स्नेही : ‘हा बालक दैवी असून तो तापट असेल.’ (त्यांनी बाळ गर्भात असतांनाच असे सांगितले होते.) प्रत्यक्षात तसेच दिसत आहे.
७ आ. प.पू. दास महाराज आणि पू. सौरभदादा (सनातनचे ३२ वे व्यष्टी संत) : ‘हा दैवी बालक आहे.’
८. संतांनी अर्णवचे केलेले कौतुक !
अ. पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (सनातनच्या ९० व्या संत, वय ७४ वर्षे) मिरज आश्रमात मला भेटायला आल्या होत्या. तेव्हा अर्णवचे छायाचित्र पाहून त्यांची भावजागृती झाली. त्या म्हणाल्या, ‘‘हा छोटा बाळकृष्ण आहे.’’
– पू. जयराम कृष्णाजी जोशी (सनातनचे ५१ वे संत, वय ८४ वर्षे, सनातन आश्रम, मिरज) आणि सौ. आरती प्रसाद म्हैसकर.
आ. सद़्गुरु मुकुल गाडगीळ म्हणाले, ‘‘बाळ सात्त्विक आहे.’’ – सौ. आरती प्रसाद म्हैसकर
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे संकटे टळत असल्याची झालेली जाणीव !
अ. ‘बाळ जन्माला येणार कि नाही ?’, अशी स्थिती निर्माण झाल्यावर माझे बाबा (श्री. प्रसाद म्हैसकर) म्हणाले, ‘‘येणारा जीव गुरुदेवांच्या ईश्वरी राज्याच्या कार्यासाठी उपयुक्त असेल, तर तो निश्चितच जन्माला येईल. गुरुदेवांच्या कृपेने जे योग्य असेल, तेच घडेल.’
– श्री. पुष्कर प्रसाद म्हैसकर
आ. ‘या संपूर्ण कालावधीत अनेक संकटे, अडथळे आणि अडचणी येत असतांना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी समाजातील विविध संत, स्नेही, वैद्य अन् आधुनिक वैद्य यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर प्रत्यक्ष समवेत आहेत’, हे वेळोवेळी जाणवत होते.
इ. या सर्व प्रसंगांतून जातांना आयुष्यातील अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा साधनेचे महत्त्व देवाने माझ्या लक्षात आणून दिले. ‘साधनेमुळे संकटे टळत नाहीत, तर संकटांची भीती दूर होते’, हे शिकता आले.’
– श्री. प्रसाद श्रीकांत म्हैसकर
१०. चि. अर्णवविषयी ही सूत्रे पाठवतांना आलेले अडथळे : ‘टंकलेखन करत असतांना विद्युत पुरवठा खंडित होणे, अर्णवचे छायाचित्र काढण्याच्या काळात तो रुग्णाईत होणे, संकलन विभागात धारिका न उघडणे, त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार धारिका सुधारून पाठवतांना पुन्हा चि. अर्णवला अकस्मात् ‘उलट्या आणि ताप येणे’, असे त्रास झाले.
११. कृतज्ञता : श्री हनुमंत, प.पू. दास महाराज आणि प.पू. गुरुदेव सतत आमच्या समवेत आहेत’, याची आम्हाला प्रत्येक प्रसंगात अनुभूती आली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी अनंत कृतज्ञता ! ‘एका बाजूने शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक संकटे येत असतांना दुसरीकडे ‘प्रत्येक क्षणी गुरुदेव काळजी घेत आहेत, ते समवेत आहेत’, या अनुभूतीमुळे या सर्व प्रसंगांना स्थिरपणे सामोरे जाता आले. ‘ही गुरुदेवांची कृपा आणि त्यांनी शिकवलेल्या साधनेचा परिणाम आहे’, याची जाणीव होऊन त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– श्री. पुष्कर प्रसाद म्हैसकर आणि सौ. अनुश्री पुष्कर म्हैसकर (चि. अर्णवचे आई-वडील) श्री. प्रसाद श्रीकांत म्हैसकर आणि सौ. आरती प्रसाद म्हैसकर (चि. अर्णवचे आजी-आजोबा, वडिलांचे आई-वडील)
सर्व सूत्रांचा दिनांक २१.७.२०२२
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
|