(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ यांच्या हत्येचे प्रकरण

असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येमध्ये उत्तरप्रदेशच्या भाजप सरकारची भूमिका काय आहे, पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांच्या उपस्थितीत हत्या करणारे हे लोक कोण आहेत ?, याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी.

मी न्यायालयाला विनंती करतो की, या प्रकरणाची स्वतःहून चौकशी करावी. न्यायालयाने समिती स्थापन करावी. एक अन्वेषण पथक स्थापन करा आणि कालबद्ध अन्वेषण करा, ज्यामध्ये उत्तरप्रदेशचा कोणताही अधिकारी नसावा. अन्वेषण वेळेत पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांच्यात घटनात्मक नैतिकता जिवंत असेल, तर त्यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणीही त्यांनी केली. ओवैसी पुढे म्हणाले की, भाजप सरकार कायद्यानुसार चालत नाही, तर बंदुकीच्या जोरावर चालत आहे. यामुळे लोकांचा राज्यघटनेवरील विश्‍वास अल्प होईल.

संपादकीय भूमिका

  • एका गुंडाच्या हत्येनंतर थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी हे कधी धर्मांध मुसलमानांच्या हातून हिंदूंची हत्या झाल्यानंतर ‘ब्र’ काढत नाहीत, हे लक्षात घ्या !