बेमेतरा (छत्तीसगड) येथे विहिंपकडून मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ !

क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करून केली होती एका हिंदूची हत्या !

विश्‍व हिंदु परिषदेने घेतली मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ

बेमेतरा (छत्तीसगड) – येथे ८ एप्रिल या दिवशी धर्मांध मुसलमानांनी क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर आक्रमण केले होते. यात एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर विश्‍व हिंदु परिषदेने बेमेतरा बंदचेही आवाहन केले होते. तसेच मोर्चाही काढण्यात आला होता. आता विश्‍व हिंदु परिषदेने मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ घेतल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. यात भाजपचे माजी खासदारही उपस्थित होते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

१. विहिंपने काढलेल्या मोर्च्यामध्ये विहिंपचे नेते मुकेश चांडक यांनी मोर्च्यात सहभागी झालेल्यांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याची शपथ दिली.

२. या संदर्भात भाजपचे नेते रूपसिंह मांडवी यांनी याविषयी म्हटले की, विहिंपने केलेल्या बंदला आम्ही समर्थन दिले होते; मात्र आम्हाला या शपथेविषयी काहीही कल्पना नाही.

(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल

राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, ‘‘बेमेतरा भागात झालेल्या २ मुलांच्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवी आहे; मात्र या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो आहे.

विरोधकांकडून केवळ राजकारण चालू आहे. (बघेल यांनी असे सांगून धर्मांध मुसलमानांना पाठीशीच घातले आहे. काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते ! – संपादक)