हावडा येथे दुसर्‍या दिवशीही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

हावडा (बंगाल) – येथील शिवपूर भागात रामनवमीच्या दिवशी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक आणि मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे ३१ मार्च या दिवशी सकाळीही येथील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. दोन्ही वेळेला पोलिसांचा, तसेच अर्धसैनिक दलाचा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित असतांनाही धर्मांध मुसलमान हिंसाचार करत होते. त्यांनी पोलिसांच्या समोरच पोलिसांच्या गाड्या जाळल्या. पोलीस धर्मांध मुसलमानांना हिंसाचार करण्यापासून रोखण्याऐवजी मूकदर्शक राहिले. या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

रामनवमीच्या वेळी बंगालमध्ये विविध ठिकाणी हिंदूंनी मिरवणुका काढल्या होत्या. त्यात हावडा येथेच धर्मांध मुसलमानांकडून यावर आक्रमण झाले. धर्मांध मुसलमानांचे म्हणणे आहे की, मिरवणुकीच्या वेळी हिंदूंकडून आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याने उद्रेक झाला, तर हिंदूंचे म्हणणे आहे की, आक्रमण ठरवूनच करण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • ‘रमझानच्या पवित्र मासात उपवास करणारे दंगल करण्यास, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक करण्यास कसे काय सिद्ध होतात ?’, हा प्रश्‍न निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी मुसलमानांना कधी विचारत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पहाता, तसेच तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लावण्याला पर्याय नाही !
  • ममता बॅनर्जी यांनी दंगलीसाठी हिंदूंचा ठरवले उत्तरदायी !

  • (म्हणे) ‘मी आधीच सांगितले होते की, मुसलमानबहुल भागात मिरवणूक काढू नका !’

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (डावीकडे)

रामनवमीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामभक्तांना चेतावणी देतांना म्हटले होते, ‘जर रामनवमीच्या वेळी शस्त्रे घेऊन मुसलमान भागात आक्रमण केले, तर कठोर कारवाई करण्यात येईल. मुसलमान रमझानच्या काळात चुकीचे काहीच करत नाहीत.’ या पार्श्‍वभूमीवर रामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीवर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, माझे डोळे आणि कान उघडे आहेत. मला सर्व काही दिसत आहे. मी आधीच सांगितले होते, असे होणार. मी आधीच चेतावणी दिली होती की, मुसलमानबहुल भागातून मिरवणूक काढू नका. मिरवणूक काढल्यास हिंसाचार होऊ शकतो. रमझानचा मास आहे. त्यामुळे मुसलमान काही चुकीचे करू शकत नाहीत. जे कुणी हिंसाचारामध्ये सहभागी आहेत, त्यांचे काहीही ऐकले जाणार नाही. मी पोलिसांना हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश देत आहे.’ यावरून दंगलखोर मुसलमानांना पाठीशी घालून निरपराध रामभक्तांना दंगलीच्या प्रकरणी उत्तरदायी ठरवण्यात आल्याने हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.

संपादकीय भूमिका

  • राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व सरकारचे असतांना अशा प्रकारे मुसलमानबहुल भागात हिंदूंवर आक्रमण करण्यात येऊ शकते, हे जर ममता बॅनर्जी यांना ठाऊक होते, तर त्यांनी धर्मांधांचा आधीच बंदोबस्त का केला नाही ?
  • हिंदूंनी मुसलमानबहुल भागात त्यांची धार्मिक मिरवणूक काढू नये, असे राज्यघटनेत लिहिलेले आहे का ? हा भारत आहे कि बांगलादेश ?
  • हिंदूंनो, मुसलमानबहुल गाव, जिल्हा, शहर, राज्य आणि पुढे देश निर्माण झाला, तर तुमचे अस्तित्व नष्ट होणार; कारण असे निधर्मी शासनकर्ते तुमचे कदापि रक्षण करणार नाहीत, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

ममता बॅनर्जी यांनी सुरक्षेचे नियोजन करायला हवे होते ! – भाजप

या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपने म्हटले की, राज्यात रामनवमीच्या दिवशी १० सहस्र मिरवणुका निघणार होत्या.

अशा वेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणार्‍या ममता बॅनर्जी यांनी याच्या सुरक्षेचे नियोजन करणे आवश्यक होते; मात्र त्या धरणे करत बसल्या.

फरक पहा – बांगलादेशतील रामनवमी आणि ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगाल मधील रामनवमी