नागपूर येथील ३ ‘हुक्‍का पार्लर’वर पोलिसांची धाड !

हुक्‍का पार्लर चालकांच्‍या विरोधात गुन्‍हे नोंद

नागपूर – येथील अवैध हुक्‍का पार्लरपैकी सीताबर्डी आणि अंबाझरी येथील ३ हुक्‍का पार्लरवर नागपूर पोलिसांनी धाड टाकली आहे. पोलिसांनी हुक्‍का पॉट, तंबाखू आदी जप्‍त केले आहे. या प्रकरणी ३ हुक्‍का पार्लर चालकांच्‍या विरोधात गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत. (अवैध हुक्‍का पार्लर उभी राहीपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होते ? – संपादक) अवैध हुक्‍का पार्लरच्‍या ठिकाणी ग्राहकांना बंदी असलेला तंबाखू पुरवला जात असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे धाड टाकल्‍यावर तेथे ग्राहक आढळून आले.

‘पोलीस परत गेल्‍यावर हुक्‍का पार्लर चालू होतात. त्‍यामुळे त्‍यांचा कायमस्‍वरूपी बंदोबस्‍त करण्‍यात यावी’, अशी मागणी नागरिक करत आहेत. (याचा अर्थ पोलिसांचेच हुक्‍का पार्लरना पाठबळ नसेल कशावरून ? – संपादक)