मी आणि अन्य साधक केरळ राज्याच्या दौर्यावर असतांना तेथे हिंदूंचे होत असलेले धर्मांतर, हिंदु मंदिरांप्रमाणे बनवण्यात आलेली केरळमधील चर्च आणि त्यांना देण्यात आलेली नावे अन् यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची जाणवलेली आवश्यकता यांविषयीची सूत्रे येथे देत आहे.
१. हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असणे
‘केरळ राज्यामध्ये कागदोपत्री ५४ टक्के हिंदु, २७ टक्के मुसलमान आणि १७ टक्के ख्रिस्ती, अशी वर्गवारी आहे; परंतु प्रत्यक्ष पाहिले, तर ‘ही आकडेवारी किती खरी आहे ?’, हे ठाऊक नाही; कारण इथे मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे प्रमाण पुष्कळ आहे. ‘हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे’, असे लक्षात आले.
२. हिंदु मंदिरांप्रमाणे बनवण्यात आलेली केरळमधील चर्च
२ अ. हिंदूंच्या मंदिरासमोरील गरुड खांबाप्रमाणे चर्चसमोरही तसे खांब उभे करण्याचे प्रयत्न चालू असणे : या राज्यातील चर्च वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य दिव्य आहेत. जसा हिंदूंच्या मंदिरासमोर गरुड खांब असतो, त्या पद्धतीचा खांब ते चर्चच्या समोर उभा करत आहेत. प्रवास करत असतांना आम्ही केरळमधील खेडेगावात गेलो. त्या ठिकाणी आणि शहरी भागातही पुष्कळ मोठी अन् संख्येने अधिक चर्च आहेत.
२ आ. हिंदूंच्या मंदिरासमोरील दीपमाळेप्रमाणे दक्षिण केरळमधील चर्चसमोर दिवे लावण्याचा एक खांब उभा केलेला असणे : हिंदूंच्या मंदिरांपुढे दिवे लावण्यासाठी एक दगडी किंवा सिमेंटची दीपमाळ असते. तिच्यावर आपण वरपासून खालपर्यंत दिवे लावू शकतो. तिची उंची १० ते १५ फूट असते. त्याच आकाराचा दिवे लावण्याचा एक खांब (दीपमाळेप्रमाणे) ख्रिस्त्यांनी दक्षिण केरळमधील चर्चसमोर उभा केला आहे.
३. हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करून हिंदूंना फसवणारे ख्रिस्ती !
३ अ. येथे चर्चऐवजी ‘आश्रम’ या शब्दाचा वापर करण्याचा भाग वाढला आहे.
३ आ. पादत्राणे काढून चर्चमध्ये जाण्यास प्रारंभ होणे : चर्चमध्ये जातांना लोक चपला, बूट घालून जातात; परंतु अलीकडे आता काही चर्चमध्ये जातांना पादत्राणे बाहेर काढून जाण्यास सांगतात.
३ इ. ख्रिस्त्यांनी हिंदूंप्रमाणे वेशभूषा करणे : केरळमध्ये हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती लोक लवकर ओळखता येत नाहीत; कारण येथील सर्वांची भाषा मल्याळम् आहे अन् येथील सर्वच लोक पांढरा सदरा आणि लुंगी, असा पोशाख परिधान करतात. येथील बरेच ख्रिस्ती हिंदूंसारखे कपडे घालून आणि टिळा लावून फिरतात अन् हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात.
आणखीही बर्याच गोष्टी असू शकतात, ज्या अजून बाहेर आलेल्या नाहीत. उद्या हेच लोक म्हणतील, ‘‘हे आम्हीच चालू केले आहे.’’ यालाच म्हणतात ना, ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ हिंदूंनी ही वेळ येऊ द्यायला नको. त्यासाठी हिंदूंनी आतापासून सतर्क रहायला हवे. हे प्रकार थांबवायला हवेत; नाहीतर हेच मिशनरी उद्या तुमच्या-आमच्या डोक्यावर बसायला घाबरणार नाहीत.
४. हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा वेगाने प्रयत्न करणारे ख्रिस्ती अन् मुसलमान आणि हिंदूंनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता !
केरळ राज्यात धर्मांतराची माेठमोठी केंद्रे आहेत. त्या ठिकाणी हिंदू मोठ्या प्रमाणात येतात. इतर राज्यांत चर्चसमोर खांब पाहिले नाहीत; किंबहुना अजून नाहीत; परंतु त्यांचा हा प्रयोग केरळमध्ये यशस्वी झाला की, ते हा प्रयोग इतर राज्यांमध्येही राबवतील. त्यांनी हिंदु संस्कृतीचा एक एक भाग त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता ‘हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा किती वेगाने प्रयत्न चालू आहे !’, हे लक्षात येते. ‘एकीकडे स्वतःचा पंथ वाढावा; म्हणून सतत काहीतरी करत रहाणारे ख्रिस्ती आणि मुसलमान आहेत, तर दुसरीकडे हिंदु धर्माचीच चेष्टा करणारे निधर्मी हिंदू या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत’, हे लक्षात येते. सर्व हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन ‘आपला हिंदु धर्म कसा सुरक्षित राहील ?’, याकडे लक्ष देणे अधिक आवश्यक आहे. स्वतः धर्मशिक्षण घेऊन इतरांनाही ते दिले पाहिजे.
‘परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), तुमच्या कृपेमुळे केरळ दौर्यात या गोष्टी लक्षात आल्या आणि तुम्ही त्या माझ्याकडून लिहून घेतल्या. ‘हा लेख वाचून हिंदू जागृत होऊ देत’, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना !’
– श्री. वाल्मिक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०१९)