वर्ष २०२५ मध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये युद्ध होईल !  

अमेरिकेच्या वायूदलातील जनरलचा दावा

अमेरिकेच्या वायूदलातील जनरल माइक मिन्हान

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये येत्या २ वर्षांत म्हणजे वर्ष २०२५ मध्ये युद्ध होईल, असा दावा अमेरिकेच्या वायूदलातील जनरल माइक मिन्हान यांनी केला आहे. तसेच त्यांनी सैन्य अधिकार्‍यांना युद्धासाठी सज्ज रहाण्याचे निर्देशही दिले आहेत. हे युद्ध तैवानच्या सूत्रावरून होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

माइक मिन्हान म्हणाले की, अमेरिका आणि तैवान यांमध्ये वर्ष २०२४ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे अमेरिका निवडणुकीत गुंतल्याने चीन तैवानच्या दिशेने आगेकूच करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या परिस्थितीत अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागेल. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल.