अल्‍पाहारासह दूध घातलेला चहा किंवा कशाय घेण्‍यापेक्षा कोरा चहा किंवा कशाय घ्‍यावा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४३

कोरा चहा
वैद्य मेघराज पराडकर

 दूध आणि मीठ यांचा संयोग आरोग्‍याला हानीकारक आहे. कोणत्‍याही अल्‍पाहारामध्‍ये मीठ असतेच. त्‍यामुळे अल्‍पाहाराच्‍या सोबत चहा किंवा कशाय घ्‍यायचा झाल्‍यास तो कोरा, म्‍हणजे दूध न घालता घ्‍यावा.’

वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२..२०२३)