पाद्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शिबिरांमध्ये चालतो समलैंगिक क्लब !

  • दिवंगत माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या पुस्तकात दावा

  • दाखवले जातात अश्‍लील चित्रपट !

पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळामध्ये पाद्री बनण्यासाठी देण्यात येणार्‍या प्रशिक्षण शिबिरांमध्ये विशेषतः अमेरिकेतील शिबिरांमध्ये उघडपणे समलैंगिक क्लब

नवी देहली – ख्रिस्त्यांचे माजी सर्वोच्च धर्मगुरु पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या निधनानंतर त्यांचे पुस्तक ‘ख्रिस्ती धर्म काय आहे ?’ प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी व्हॅटिकनच्या अंतर्गत चालवण्यात येणार्‍या कॅथॉलिक चर्चमधील अनैतिक गोष्टींची माहिती उघड केली आहे. यात पाद्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्‍या शिबिरामध्ये समलैंगिक क्लब चालण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘अशा दाव्यांमुळेच कदाचित् त्यांनी त्यांचे हे पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यास सांगितले कि काय ?’, अशी चर्चा होत आहे.

ख्रिस्त्यांचे माजी सर्वोच्च धर्मगुरु पोप बेनेडिक्ट १६ वे

१. पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळामध्ये पाद्री बनण्यासाठी देण्यात येणार्‍या प्रशिक्षण शिबिरांमध्ये विशेषतः अमेरिकेतील शिबिरांमध्ये उघडपणे समलैंगिक क्लब चालवण्यात येत आहेत. ते उघडपणे काम करत आहेत. या सर्व अनैतिक कामांमुळे शिबिरांचे वातावरण पालटले आहे.

२. या पुस्तकात पुढे दावा करण्यात आला आहे की, एका बिशपने (वरच्या श्रेणीतील पाद्रयाने) शिबिरामध्ये अश्‍लील चित्रपट दाखवण्याची अनुमती दिली होती.

३. दक्षिण जर्मनीमधील एका शिबिरांमध्ये पाद्री आणि विद्यार्थी एकत्र रहात होते, तसेच पत्नी, मुले आणि काही प्रसंगात मैत्रिणींसमवेत जेवत होते.

संपादकीय भूमिका

आता स्वतः माजी पोपच ही माहिती उघड करत असल्यावर पाद्रयांची नैतिकता शिल्लक रहातच नाही ! याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत कि प्रसारमाध्यमे याचे वृत्त प्रसारित करणार नाहीत !