सध्या बर्याच राजकीय नेत्यांकडून ‘मीही हिंदू आहे; पण हिंदु राष्ट्राच्या विरोधात आहे’, असे विधान सहजपणे स्वार्थापोटी केले जात आहे. हिंदु म्हणजे ज्याच्यातून हीन गुण निघून गेले आहेत आणि ज्याच्यामध्ये मानवता, माणुसकी, दया, क्षमा, शांती असे ईश्वरी गुण असलेली व्यक्ती. यावरून हिंदु राष्ट्र म्हणजे मानवतावादी लोकांचे, मानवतावादी लोकांसाठी आणि मानवतावादी लोकांकडून चालवले जाणारे राज्य ! सध्याच्या राजकीय नेत्यांचे वरील प्रकारचे विधान म्हणजे ‘मी मानवतावादी आहे; पण मानवतावादी राज्याच्या विरोधात आहे’, असे हास्यास्पद विधान आहे’, असे म्हटले, तर त्यात चूक ते काय ?
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल (१८.१.२०२३)