बांगलादेशातील नेता तारिक रहमान (म्हणे) ‘हिंदु धर्माचे ग्रंथ कोणतेही नैतिक शिक्षण देत नाहीत !’

बांगलादेशातील नेता तारिक रहमान याचे हिंदुद्वेषी विधान !

ढाका (बांगलादेश) – हिंदु धर्माचे ग्रंथ कोणतेही नैतिक शिक्षण देत नाहीत, असे विधान बांगलादेशातील ‘बांगलादेश गोनो राइट्स कौन्सिल’चा नेता आणि ‘जमात-ए-इस्लामी’चा प्रमुख नुरुल हक नूर याचा सहकारी तारेक रहमान याने केले आहे. त्याने हिंदूंच्या धर्मग्रंथांना ‘अश्‍लील’ म्हटले आहे. सामाजिक माध्यमांवरून थेट प्रसारित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्याने हे विधान केले.

बांगलादेशच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, तारेक रहमानचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर काही रोहिंग्या नेत्यांचीही हत्या करण्यात आली आहे. वर्ष २०२१ मध्ये दुर्गापूजेच्या काळात बांगलादेशात हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली होती. यामागे नुरुल हक नूर याचा हात असल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु कधी अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांवर अशी टीका करत नाहीत; मात्र अन्य धर्मीय नेहमीच हिंदूंच्या धर्मग्रंथांवर टीका करतात, यालाच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सर्वधर्मसमभाव म्हणतात, हे लक्षात घ्या !