डोंगर आणि जंगले तोडली गेल्याने जोशीमठ येथे कठीण परिस्थिती उद्भवली !

जोशीमठच्या आपत्तीवर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी यांची प्रतिक्रिया

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

जोशीमठ (उत्तराखंड) – शंकराचार्य म्हणाले की, निसर्गाशी छेडछाड करू नये. पर्वत, जंगल आणि नद्या या पृथ्वीचा समतोल राखतात; मात्र विकासाच्या नावाखाली डोंगर आणि जंगले तोडली गेल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, अशी प्रतिक्रिया पुरी पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी यांनी जोशीमठ येथील आपत्तीविषयी व्यक्त केली.

सौजन्य: ABP NEWS

जोशीमठमधील आपत्तीविषयी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील धामी सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने जोशीमठ येथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी  पथक सिद्ध केले आहे. यासह येथील सर्व प्रकारच्या बांधकामांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.

अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याचे काम चालू !

उत्तराखंड राज्यातील जोशीमठ येथे घरे आणि इमारती यांना भेगा पडण्याचे प्रकार सातत्याने चालूच आहे. येथील भूमी खचली असून स्थानिकांना भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. येथील अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याचे काम चालू आहे.