उत्तरप्रदेशमध्ये रफिक सिद्दिकी याने छळ केल्याने हिंदु तरुणीची आत्महत्या !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी येथे रफिक सिद्दिकी नावाच्या मुसलमान तरुणाच्या छळाला कंटाळून एका हिंदु तरुणीने आत्महत्या केली. ‘मुसलमान तरुण तिच्यावर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी दबाव टाकत होता. तसे न केल्याच तिला घरातून उचलून नेण्याची धमकी देत होता’, असा आरोप मृत तरुणीच्या नातेवाइकांनी केला आहे. मृत मुलीचे वडील संतराम शर्मा यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून रफिकला कह्यात घेतले आहे.

१. मृत मुलीच्या वडिलांनी, ‘रफिकने वारंवार दिलेल्या धमक्यांना कंटाळून माझ्या मुलीने ८ जानेवारी २०२३ या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली’, असे तक्रारीत म्हटले आहे.

२. मृत मुलीच्या पालकांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. शर्मा यांनी या व्हिडिओमध्ये, ‘रफिक सिद्दिकी माझ्या मुलीला मुसलमान बनण्याची आणि बुरखा घालण्याची धमकी देत होता’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेत असूनही धर्मांध उद्दामपणे वागून हिंदु युवतींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात, हे संतापजनक ! त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना राबवणे आवश्यक !