भारतातील धार्मिक दंगली : समस्‍या आणि उपाय

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्‍कळ जुना आहे. हा संपूर्ण इतिहास कुणी लिहून काढतो म्‍हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्‍यांच्‍या ‘पाकिस्‍तान अर्थात् भारताची फाळणी’ या पुस्‍तकात पृष्‍ठ क्र. १२६ ते १४४ यांवर वर्ष १९२० ते १९४० या २० वर्षांच्‍या कालावधीमध्‍ये भारतात हिंदु-मुसलमान यांच्‍यात झालेल्‍या अनेक दंगलींवर विस्‍तृत प्रकाश टाकला आहे. यात दंगलीची कारणे, दंगलीत झालेली जीवित आणि वित्त हानी, स्‍त्रियांची झालेली विटंबना यांसह मुसलमानांची मानसिकता यांचाही परामर्श घेण्‍यात आला आहे. उत्‍सुक वाचकांनी तो अवश्‍य वाचावा. भारतातील धार्मिक दंगलींची समस्‍या आणि त्‍यावरील उपाय यांविषयीचे विस्‍तृत लिखाण येथे देत आहोत.

(भाग १)

दंगलीमध्‍ये दगडफेक आणि जाळपोळ करतांना दंगेखोर

 

१. देशात होणार्‍या धार्मिक दंगली

भारताला ‘इस्‍लामी राष्‍ट्र’ बनवण्‍यासाठी देशातील हिंदु-मुसलमान दंगली या भारतावरील मुसलमान राजवटींचे देणे आहे. मुसलमान राजवटींची तर समाप्‍ती झाली; पण इस्‍लाम धर्माचे बीजारोपण या भूमीत कायमचे झाले. पुढे हे बीज भारतात सर्वत्र वेगाने फोफावले आणि मग धार्मिक लोकसंख्‍येच्‍या आधारावर देशाची फाळणी करून मुसलमानांनी स्‍वतःसाठी स्‍वतंत्र देश निर्माण केला. ही फाळणी करतांनाही हिंदु नेत्‍यांच्‍या भोंगळपणाचा, त्‍यांच्‍या सत्तालोलुप वृत्तीचा आणि हिंदूंच्‍या विकृत अन् अतिरेकी सहिष्‍णुतेचा अचूक लाभ उठवून उर्वरित भारतातही मुसलमानांनी स्‍वतःचे अस्‍तित्‍व कायम ठेवले आणि त्‍यांचे तेव्‍हाचे अस्‍तित्‍वच देशासाठी आता कायमची डोकेदुखी ठरली आहे. या धार्मिक दंगली भारताला पोखरून काढत आहेत. भारतात सातत्‍याने होणार्‍या धार्मिक दंगली हा धर्मांधांच्‍या एक मोठ्या उद्दिष्‍टांचा एक भाग आहे. त्‍यांचे मुख्‍य उद्दिष्‍ट या देशाला ‘इस्‍लामी राष्‍ट्र’ बनवण्‍याचे आहे.

मिरावणुकांवर हल्ले

२. पूर्वनियोजित धार्मिक दंगली आणि त्‍यामुळे होणारी हिंदूंची अपरिमित हानी

या सर्व धार्मिक दंगलींचे निरीक्षण केले, तरी आपणास दिसून येईल की, या दंगली पूर्वनियोजित असतात. गच्‍चीवर दगड-गोट्यांचा साठा, पेट्रोलबाँब, घरात तलवारी, पिस्‍तुल यांचा पुरेसा साठा करून ठेवलेला असतो. दंगल भडकवण्‍याचा दिनांक आणि वेळ अगोदरच ठरवलेली असते. दंगल पेटवण्‍यासाठी मुसलमान दंगेखोरांना खरे-खोटे आणि क्षुल्लक कारणही पुरेसे असते. कित्‍येकदा तर केवळ अफवेवर विश्‍वास ठेवूनही दंगल भडकवली जाते. बहुतेक सर्वच दंगलीत हिंदूंचेच जीवित आणि वित्त यांची अपरिमित हानी होते; कारण हिंदू नेहमीच बेसावध आणि निःशस्‍त्र असतात.

३. वर्ष २०२० पासून देशात दंगलपर्वास प्रारंभ

श्री. शंकर गो. पांडे

केंद्रात भाजपची बहुमताने सत्ता आल्‍यानंतर आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्‍यापासून या देशातील बाँबस्‍फोट आणि हिंदु-मुसलमान दंगली यांवर पूर्णतः आळा बसला होता; पण देशातील ही शांतता अनेक मोदी विरोधक आणि विघ्‍नसंतोषी लोक यांना सहन होत नव्‍हती. त्‍यामुळे त्‍यांनी नियोजनपूर्वक दंगलींचे पर्व पुन्‍हा चालू केले. वर्ष २०२० पासून या देशात दंगल पर्वास प्रारंभ झाला आहे. गेल्‍या दोन-अडीच वर्षांत या धार्मिक दंगलींनी उच्‍चांक प्रस्‍थापित केला आहे. दंगलीचे जणू पेवच फुटले आहे.

४. देहलीत फेब्रुवारी २०२० मध्‍ये झालेली दंगल

फेब्रुवारी २०२० मध्‍ये देहलीत नागरिकत्‍व सुधारणा कायदा म्‍हणजेच ‘सीएए’विरुद्ध दंगल पेटवण्‍यात आली. यासाठी ओमान आणि संयुक्‍त आमिरातहून पैसा भारतात पाठवण्‍यात आला होता. या दंगलीत ५३ हिंदूंचा मृत्‍यू झाला आणि त्‍यांच्‍या कोट्यवधी रुपये किमतीची घरे अन् दुकाने यांची राखरांगोळी झाली. या दंगलीत ‘आयबी’चे (इंटेलिजन्‍स ब्‍युरो म्‍हणजेच गुप्‍तचर विभागाचे) अधिकारी अंकित शर्मा आणि पोलीस शिपाई रतनलाल, अनुज कुमार यांच्‍या हत्‍या अत्‍यंत क्रूरपणे करण्‍यात आल्‍या. दिलबाग नेगी या मिठाई दुकानदाराला त्‍याच्‍या दुकानासह जिवंत जाळण्‍यात आले. या दंगलीची जय्‍यतपणे सिद्धता करण्‍यात आली होती. मुसलमान स्‍वतःच्‍या घरात आणि घरांच्‍या छतावर दगडगोटे, पेट्रोलबाँब, काचेच्‍या बाटल्‍या, विविध शस्‍त्रे यांचा भरपूर साठा करून ठेवला होता. पुढे या दंगलीसाठी ‘आम आदमी पक्षा’चा नगरसेवक ताहिर हुसेन उत्तरदायी असल्‍याचे सिद्ध झाले. या दंगलीत तेल ओतून ती भडकवण्‍याचे काम जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयाचा (‘जे.एन्.यू.’चा) विद्यार्थी शरजील इमामने प्रामाणिकपणे केले होते. शरजीलने आपल्‍या प्रक्षोभक भाषणाच्‍या वेळी ईशान्‍य भाग भारतापासून तोडण्‍याचा स्‍वतःचा मनसुबा व्‍यक्‍त केला होता.

५. त्रिपुरात मशीद पाडल्‍याच्‍या अफवेवरून महाराष्‍ट्रात ५ ठिकाणी दंगली

देहलीच्‍या दंगलीची आग शमते ना शमते तो ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये त्रिपुरात एक मशीद पाडल्‍याची अफवा पसरवण्‍यात आली आणि या खोट्या बातमीचे पडसाद महाराष्‍ट्रात तीव्रतेने उमटले. रझा अकादमी आणि मुसलमानांच्‍या अन्‍य ६ संघटनांनी अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद (यवतमाळ), कारंजा (वाशीम) या गावात नमाजानंतर दंगलीला प्रारंभ केला. या दंगलीच्‍या वेळी दगडफेक, जाळपोळ आणि लुटालूट या नेहमीच्‍या सूत्रांचा अवलंब करून हिंदूंची अनेक दुकाने जाळली, दुकानातील पैसे आणि सामान यांची लुटमार केली. पुसदला एका दुकानदाराला मारहाण करून त्‍याचा भ्रमणभाष संच लुटून नेला. या दंगलींच्‍या कालावधीत मालेगाव येथील नवापुरा भागातील महंमद बिलाल याच्‍या घरी पोलिसांनी छापा घातला असता तेथे ३० तलवारी सापडल्‍या. या तलवारी दंगलीपूर्वी आणल्‍या होत्‍या. या तलवारी जप्‍त झाल्‍या म्‍हणून ठीक, नाही तर त्‍यांनी किती हिंदूंचे प्राण घेतले असते, ते आणि असे शस्‍त्रास्‍त्रांचे साठे कुठे अन् किती प्रमाणात साठवले असतील ? हेही सांगता येत नाही.

६. बहुसंख्‍य हिंदूंचा शोभायात्रा काढण्‍याचा अधिकार धर्मांधांकडे ?

२ एप्रिल २०२२ या दिवशी हिंदूंंचा नववर्षारंभ, म्‍हणजे गुढीपाडव्‍याचा महत्त्वाचा सण होता. त्‍या दिवशी राजस्‍थानमधील करौली येथे नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी शोभायात्रा काढण्‍यात आली. हिंदूंची ही मिरवणूक मुसलमानबहुल वसाहतीतून जात असतांना दंगलखोर मुसलमानांनी त्‍यांच्‍या घरांच्‍या छतावरून शोभायात्रेवर प्रचंड दगडफेक केली. यात अनेक हिंदू घायाळ झाले. ही दंगल पूर्वनियोजित होती आणि या दंगलीमागे ‘पी.एफ्.आय. (पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया)’ या जिहादी संघटनेचा हात होता, हे तपासाअंती सिद्ध झाले. याच संघटनेने ‘हिंदूंनी मुसलमानबहुल भागातून शोभायात्रा नेल्‍यास दंगल होईल’, अशी चेतावणी राजस्‍थानच्‍या काँग्रेस सरकारला पूर्वीच दिली होती.

एकूणच काय, तर शासनकर्त्‍यांनी केलेल्‍या मुसलमानांच्‍या तुष्‍टीकरणामुळे त्‍यांचे धाडस एवढे वाढले आहे की, या देशात हिंदूंनी स्‍वतःच्‍या मिरवणुका कोणत्‍या रस्‍त्‍यावरून आणि भागातून न्‍याव्‍यात, हे पोलीस अथवा हिंदूंनी ठरवण्‍याऐवजी मुसलमान ठरवू लागले आहेत. हा अधिकार त्‍यांनी स्‍वतःच्‍या हातात घेतला आहे. हिंदूंनाच स्‍वतःच्‍या मातृभूमीत शोभायात्रा काढणे कठीण झाले आहे. पाकिस्‍तानमधील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंचा सण-उत्‍सव जाहीरपणे साजरे करण्‍याचा अधिकार तेथील कट्टर मुसलमानांनी कधीचाच हिरावून घेतला आहे. आतातर बहुसंख्‍यांक असणार्‍या भारतातील हिंदूंचाही शोभायात्रा काढण्‍याचा अधिकार हळूहळू धर्मांधांकडून काढून घेण्‍यात येत आहे. तरीही हिंदू निद्रिस्‍त आहेत.

७. रामनवमीच्‍या दिवशी गुजरात, बंगाल, मध्‍यप्रदेश आणि झारखंड येथे पूर्वनियोजित पद्धतीने केलेली दंगल

१० एप्रिल २०२२ या दिवशी रामनवमी होती. या दिवशी गुजरातमधील छापरिया गावात रामनवमीच्‍या निमित्ताने हिंदूंनी शोभायात्रा काढली होती. ही यात्रा मुसलमानबहुल भागातून मार्गक्रमण करतांना या यात्रेवरही दंगलखोर मुसलमानांनी तुफान दगडफेक केली. त्‍याच दिवशी गुजरातमधील खंबात येथे निघालेल्‍या रामनवमीच्‍या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक करून हिंदूंची दुकाने, वाहने यांची जाळपोळ केली. विशेष म्‍हणजे ही दंगल पेटवण्‍यासाठी पूर्वसिद्धता शोभायात्रेच्‍या आदल्‍या दिवशीच झाली होती. त्‍यासाठी दंगलखोरांनी दगड आणि घातक वस्‍तू पुरवण्‍यात आल्‍या होत्‍या. ‘शोभायात्रा मशिदीजवळून जात असतांनाच दगडफेक चालू करा’, अशा सूचना दंगलखोरांना देण्‍यात आली होती. विशेष म्‍हणजे या हिंसाचाराचा कट विदेशात रचण्‍यात आला होता आणि त्‍यासाठी विदेशातून पैसाही पुरवण्‍यात आला होता. हिंदूंना कायमचा धडा शिकवण्‍यासाठी या दंगलीचे पूर्वनियोजन करण्‍यात आले होते. पोलिसांनी दंगलखोरांना पकडून त्‍यांच्‍या मोबाईलवरचे कॉल्‍स, डेटा यांची पडताळणी केल्‍यानंतर वरील गोष्‍टी स्‍पष्‍ट झाल्‍या होत्‍या.

गुजरातमधील केवळ छापरिया, खंबात येथेच नव्‍हे, तर बंगालमधील हावडा येथे विश्‍व हिंदु परिषदेने आणि वाकुरा येथे केंद्रीय राज्‍यमंत्री सुभाष सरकार यांनी रामनवमीच्‍या निमित्ताने काढलेल्‍या यात्रांवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली होती. मध्‍यप्रदेशमधील खरगोन येथे रामनवमीची शोभायात्रा मुसलमानबहुल भागात येताच त्‍यावर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. नंतर ७७ दंगलखोरांना अटक करण्‍यात आली. झारखंडमध्‍ये लोहरदगा आणि बोकारी येथे दंगलखोरांनी रामनवमीच्‍या शोभायात्रेवर दगडफेक करून हिंदूंची एक पिकअप व्‍हॅन आणि १० दुचाकी भस्‍मसात केल्‍या.

८. हनुमान जयंतीच्‍या दिवशी जहांगीरपुरी (देहली) येथे दंगल

१६ एप्रिल २०२२ या दिवशी हनुमान जयंती होती. देहलीतील हिंदूंनी यानिमित्ताने एक शोभायात्रा काढली. ही शोभायात्रा जहांगीरपुरी या मुसलमानबहुल भागात येताच नेहमीप्रमाणेच शोभायात्रेवर दगडफेक, हिंदूंची दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ चालू झाली. नंतर या दंगलीत प्रमुख भूमिका बजावणारे अस्‍लम आणि अंसार या दोघांना पकडण्‍यात आले. अस्‍लमने तर पिस्‍तुलातून गोळीबार करून एका पोलीस उपनिरीक्षकालाच घायाळ केले होते. या वेळी पिस्‍तुलाने गोळीबार करणार्‍या सोनू शेख नावाच्‍या एका दंगलखोरालाही अटक करण्‍यात आली.

९. दंगेखोरांना आता कशाचीच भीती आणि धाक न उरणे !

प्रश्‍न असे उपस्‍थित होतात की, दंगेखोरांकडे पिस्‍तुलासारखे आधुनिक शस्‍त्र कुठून येतात ? आणि पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार करण्‍याचे त्‍यांचे धाडस होतेच कसे ? दंगेखोरांना आता कशाचीच भीती आणि धाक उरला नाही. याचेच हे जणू प्रतीक आहे. तरीही प्रशासन सुस्‍त आणि हिंदू मस्‍त आहेत. दंगेखोर सोनू शेखला अटक करण्‍यासाठी पोलीस फौजफाटा त्‍याच्‍या घरी गेला असता त्‍याच्‍या कुटुंबियांनी पोलिसांवरही तुफान दगडफेक केली. याचा अर्थ दंगेखोरांना त्‍यांच्‍या कुटुंबियांचीही तन, मन आणि धन यांद्वारे साथ असते अन् त्‍याच्‍यात एवढे धाडस वाढले आहे की, तेही पोलिसांवर आक्रमण करू शकतात.

१०. दोन मासांत अनेक ठिकाणी दंगल घडवण्‍याच्‍या धर्मांधांच्‍या मानसिकतेची हिंदूंनी गंभीर नोंद घेणे आवश्‍यक !

या दंगलीचे एक विशेष असे की, या दंगलीत मुख्‍य भूमिका बजावणारा तबरेज आलम नावाचा एक दंगेखोर हा दंगा शमल्‍यावर पोलिसांनी काढलेल्‍या शांती मोर्चात आणि त्‍यांनी बोलावलेल्‍या शांतता समितीच्‍या बैठकीतही सहजगत्‍या सहभागी झाला होता. शांततेसाठी त्‍याने पोलिसांना तिरंगा यात्राही काढण्‍याची सूचना केली होती. पुढे त्‍याचा हा ढोंगीपणा सिद्ध होऊन त्‍याला अटक झाली. असे कितीतरी तबरेज समाजात वावरत असतील, हे काही सांगता येत नाही. हिंदु समाजाने अशा अस्‍तनीतील सापांना ओळखून सावध झाले पाहिजे. केवळ देहलीतच नव्‍हे, तर आंध्रप्रदेशातील होल्लागुंज या गावातही हनुमान जयंतीची मिरवणूक एका मशिदीजवळ येताच दंगेखोरांनी शोभायात्रेवर दगडफेक केली होती.

१६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंती निमित्त हिंदूंनी काढलेल्‍या शोभायात्रेच्‍या निमित्ताने भारतातील विविध भागात दंगली घडवल्‍यानंतर १७ एप्रिल या दिवशी महाराष्‍ट्रातील अचलपूर (अमरावती) येथे एका प्रवेशद्वारावरील झेंडा काढण्‍यावरून मुसलमानांकडून दंगल पेटवण्‍यात आली. ३ मे २०२२ या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती होती. त्‍या निमित्ताने राजस्‍थानमधील जोधपूर येथील बालमुकुंद बिरसा चौकात हिंदु समाजाकडून भगवा ध्‍वज लावण्‍यात आला होता. त्‍याच दिवशी मुसलमानांचा ईदचा सणही होता. दंगेखोर मुसलमानांनी चौकातील भगवा ध्‍वज काढून फेकून दिला आणि तेथे हिरवा ध्‍वज लावला. त्‍यामुळे दोन्‍ही समाजात तणावपूर्ण स्‍थिती निर्माण झाली. नेहमीच्‍या प्रथेप्रमाणे मुसलमानांनी तुफान दगडफेक चालू केली. यात ९ पोलीस घायाळ झाले, तर २११ जणांना अटक करण्‍यात आली. जोधपूरनंतर जयपूर, भरतपूर येथेही दंगली भडकवण्‍यात आल्‍या. या शहरातही अनेक जण घायाळ झाले. काही शहरात संचारबंदी लागू करावी लागली. एप्रिल आणि मे २०२२ या २ मासांत सातत्‍याने भारतात अनेक शहरात दंगलींचा आगडोंब उसळून त्‍यात हिंदूंच्‍या वित्ताची अपरिमित हानी झाली.

एकाच दिवशी एका ठराविक वेळीच संपूर्ण भारतातील मुसलमान रस्‍त्‍यावर उतरून दगडफेक आणि दंगल घडवतात. यावरून त्‍यांची संपर्क यंत्रणा किती प्रभावशाली आहे आणि त्‍यांची मानसिकता हिंदूंना सुखाने कशी जगू द्यायची नाही, या वास्‍तविकतेची गंभीर नोंद हिंदू समाजाने तात्‍काळ घेतली पाहिजे.

(क्रमशः पुढच्‍या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ (१.१.२०२३)

(भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/645397.html)

संपादकीय भूमिका 

 धर्मांधांकडून वारंवार होणार्‍या दंगली आणि त्‍यांमुळे होणारी हानी रोखण्‍यासाठी सरकारने कठोर, तर हिंदूंनी संघटित व्‍हावे !