मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे भारताची तालिबानीकरणाकडे वाटचाल ?

भारतातील धार्मिक दंगली : समस्या आणि उपाय

भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत. ८ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘देशात होणार्‍या धार्मिक दंगली ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्यासाठी केल्या जाणे, धार्मिक दंगली पूर्वनियोजित आणि हिंदूंची अपरिमित हानी करणार्‍या असणे, वर्ष २०२० पासून देशात दंगल पर्वास प्रारंभ होणे आदी सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.

(भाग २)

(भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/643293.html)

प्रतिकात्मक छायाचित्र

१. नूपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून उत्तरप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्र येथे झालेली दंगल

‘एप्रिल आणि मे २०२२ या २ मासांत संपूर्ण देश दंगलींच्या आगीत होरपळून निघाला असतांना जून मास तरी शांततेत जाईल, अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली. जून मासात दंगलखोरांना दंगली भडकावण्यासाठी भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे विधान आणि केंद्र शासनाने सैन्यभरतीसाठी घोषित केलेली ‘अग्निपथ’ योजना यांचे निमित्त मिळाले अन् परत दंगलीचे पर्व चालू झाले. भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवहिनीवरील एका चर्चेत प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविषयी एक तथाकथित वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे भाजपने त्यांना प्रवक्ते पदावरून हटवून ६ वर्षांसाठी पक्षातूनही निलंबित केले; पण मुसलमानांचे यामुळे समाधान झाले नाही. त्यांनी भारतातील विविध शहरात दंगली घडवल्या.

श्री. शंकर गो. पांडे

नूपुर शर्मा यांच्या विधानाची भरपूर चिकित्सा केली गेली. त्यांनी केलेले विधान सत्य आहे कि निराधार ? त्यांनी असे विधान कोणत्या परिस्थितीत केले ? आणि का केले ? याचा शोध घेतला गेला. नूपुर शर्मा यांच्या विधानावर मुसलमान समाज जितका भडकेल तेवढी त्या धर्माची, त्याच्या शिकवणुकीची चिकित्सा अधिक सखोलपणे केली जाईल. कोणत्याही धर्माने चिकित्सेला घाबरण्याचे तसे काही कारण नाही. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः ।’ म्हणजे ‘अनाग्रही चर्चेतून, म्हणजे वादातून तत्त्वबोध होतो’, या तत्त्वाला हिंदु धर्माची मान्यता आहे. तशी मान्यता सर्वच धर्मांनी घ्यावयास पाहिजे.

दुसरे म्हणजे नूपुर शर्मा यांचे विधान तथ्यावर आधारित नाही. ते कसे खोटे आहे ? याचा युक्तीवाद वा प्रतिवाद मुसलमान धर्मगुरूंना करता आला असता; पण मुसलमान समाज अशा वादविवादात कधी पडत नाही. त्यांच्या धर्माची कुणी चिकित्सा केली की, त्यावरची त्यांची प्रतिक्रिया नेहमीच हिंसक असते. ३ जून २०२२ चा नमाज आटोपल्यानंतर कानपूरमध्ये नूपुर शर्मांच्या विधानाचे निमित्त पुढे करून दंगल भडकावण्यात आली. यात ३३ जण घायाळ झाले. कानपूरची दंगल इतर दंगलींप्रमाणेच सुनियोजित होती. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौर्‍याच्या कालावधीत ती भडकावण्यात आली होती. या दंगलीचा प्रमुख सूत्रधार असणारा जफर हयात हाशमी याला पोलिसांनी अटक केली. त्याच दिवशी झारखंडमधील रांची येथेही दंगल भडकावण्यात आली. या हिंसाचारात पोलीस अधीक्षक सुरेंद्रकुमार झा हे गंभीर घायाळ झाले. दंगलखोर पोलिसांनाही भीत नाहीत; मग सामान्य आणि निःशस्त्र हिंदू अशा हिंसाचारात किती मोठ्या प्रमाणात भरडले जात असतील, याची आपण कल्पना करू शकतो. दंगलखोरांचा हिंसाचार पाहून अंततः पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात २ दंगलखोर ठार झाले. उत्तरप्रदेशमधील प्रयागराज, लक्ष्मणपुरी आणि सोलापूर (महाराष्ट्र) अशा अनेक गावांतही मुसलमानांनी मोर्चे काढले, तसेच दगडफेक अन् जाळपोळ केली.

२. नूपुर शर्मा यांच्या विधानाला इस्लामी देशांनी केलेला विरोध

विशेष म्हणजे आतापर्यंत भारतातील धार्मिक वादाची जगातील अन्य कोणत्याही इस्लामी देशांनी नोंद घेतली नव्हती; पण नूपुर शर्मा यांच्या विधानाची प्रतिक्रिया इराण, सौदी अरब, इंडोनेशिया, कुवेत, कतार आणि पाकिस्तान अशा इस्लामी देशांतही उमटली. कतारने तर भारताच्या उपराष्ट्रपतींशी पूर्वीच ठरलेला भोजन समारंभ रहित केला. ५७ इस्लामी देशांच्या ओ.आय.सी. (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पाेरेशन) या संघटनेनेही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध केला. जेरूसलेमच्या अक्सा मशिदीत एकत्र येऊन मुसलमानांनी हिंदुविरोधी घोषणा दिल्या. इतकेच नव्हे, तर गायीची पूजा करणार्‍या हिंदूंच्या विरोधात जिहाद पुकारण्याचे आवाहन मुसलमानांना केले. कोणत्याही देशातील एखादा मुसलमान चुकत असेल, तरी त्याच्या देशातीलच नव्हे, तर जगातील सर्व मुसलमान त्याच्या पाठीशी उभे रहातात; पण एखादा हिंदू योग्य असला, तर त्याच्या बाजूने त्याच्याच देशातील हिंदू उभे रहात नाही. हिंदु-मुसलमान यांच्या वृत्तीमधील हा भेद आता तरी हिंदूंनी लक्षात घेतला पाहिजे.

प्रतिकात्मक छायाचित्र

३. हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या विडंबनाविषयी कुणीही विरोध न करणे

नूपुर शर्मा यांच्या तथाकथित वादग्रस्त विधानावरून देश पेटवायला निघालेले भारतातील मुसलमान असो किंवा नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करणारे मुसलमान देश असो, धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांवर जेव्हा अश्लील अन् अवमानजनक टीका आणि विधाने केली जातात, तेव्हा निषेधाचा सूर ना भारतातील मुसलमानांकडून निघतो, ना जगातील कुणा मुसलमान देशाकडून ! मुसलमानांनी आतापर्यंत हिंदूंच्या देवता आणि त्यांची श्रद्धास्थाने यांविषयी जी काही अश्लील अन् अवमानजनक विधाने केली आहेत, ती एकत्रित केली, तर एक जाडजूड ग्रंथ होईल; म्हणून विस्तार भयास्तव मोजकीच विधाने देतो.

४. हिंदूंच्या आत्यंतिक द्वेषापायी मुसलमानांकडून केली जाणारी टीका

असे म्हटले जाते की, जे स्वतः काचेच्या घरात रहातात, त्यांनी दुसर्‍यांच्या घरावर कधीच दगडफेक करू नये; पण हे पथ्य मुसलमान समाजाकडून कधीच पाळण्यात येत नाही. स्वत:च्या धर्माची साधारण चिकित्साही सहन न करणारे धर्मांध मुसलमान हे हिंदू, हिंदु धर्म आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर वाटेल तशी आधारहीन, असत्य आणि अश्लील टीका करतांना कधीच मागे-पुढे पहात नाहीत. हिंदूंच्या आत्यंतिक द्वेषापायी त्यांच्याविषयी बोलतांना ‘मुंह में आया सो बक दिया । (तोंडात येईल तसे वाटेल ते बोलणे) अशी मुसलमानांच्या मनाची आणि वाणीची अवस्था असते.

४ अ. एम्.आय.एम्.च्या ओवैसी बंधूंनी हिंदूंच्या देवतांवर टीका करणे : एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी हे दोघे नेहमीच त्यांच्या भाषणातून हिंदु अन् हिंदूंची श्रद्धास्थाने यांवर अतिशय अश्लील अन् अवमानजनक भाषेत टीका-टिप्पणी करत असतात. त्यांच्या प्रक्षोभक आणि जहाल भाषेविषयी दोघे भाऊ केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही कुप्रसिद्ध आहेत. नुकतीच अकबरुद्दीन ओवैसी यांचीच एक ध्वनीचित्रफित सामाजिक माध्यमांवर पहाण्यात आली. यात ते म्हणतात, ‘‘गायीचे मांस मोठे चवदार असते. तिच्या मांसाविना माझ्या तोंडातील घास घशाखाली उतरत नाही.’’ याच ध्वनीचित्रफितीत त्यांनी प्रभु श्रीरामांची माता कौसल्याविषयीही अश्लील भाषा वापरली. हिंदूंच्या विविध देवतांची नावे घेतांना ते म्हणाले, ‘‘इस मुबारक मैहफिल में मैं उन मनहूस नामों को लेकर इस मैहफिल को खराब करना नहीं चाहता.’’ (या मेजवानीमध्ये ती अपशकुनी नावे घेऊन येथील वातावरण खराब करू इच्छित नाही) अशीच भाषा हिंदूंनी मुसलमानांच्या आराध्याबाबत वापरली, तर मात्र सर्व देशात आग पेटवली जाते.

४ आ. शर्जिल उस्मानीसारखे वक्तव्य एखादा हिंदु पाकिस्तानमध्ये मुसलमानांच्या विरोधात करू शकतो का ? : पुण्यातील एल्गार परिषदेत बोलतांना ‘जे.एन्.यू.’चा (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचा) विद्यार्थी शर्जिल उस्मानी बरळला होता, ‘‘हिंदु समाज सडलेला आहे. हा समाज हत्या करतो, घरी जाऊन अंघोळ करतो आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा हत्या करतो.’’ पाकिस्तानमधील एखादा हिंदु तेथेच ‘मुसलमान समाज सडलेला आहे’, असे वक्तव्य करू शकतो का ? आणि एखाद्या हिंदूने धाडसाने असे वक्तव्य केलेच, तर तो किती दिवस जिवंत राहू शकेल ?; पण बहुसंख्य हिंदु असणार्‍या भारतात शर्जिलच काय, अन्य कोणताही मुसलमान हिंदूंविरुद्ध हवे ते वक्तव्य करू शकतो आणि उजळ माथ्याने फिरूही शकतो.

४ इ. सर्व आतंकवादी आणि त्यांच्या संघटना इस्लामीच : विशेष म्हणजे हिंदु समाजाला हत्यारा म्हणणारा शर्जिल हे विसरून जातो की, केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील निष्पापांची धर्मवेडापायी निर्घृणपणे हत्या करणारे सर्व आतंकवादी त्याच्याच धर्माचे आहेत. ओसामा बिन लादेन आणि अबू बकर बगदादीसारखे क्रूरकर्माही त्याच्याच धर्मात जन्माला झाले आहेत. इसिस, बोको हराम, अल् कायदा अशा शेकडो आतंकवादी संघटनाही त्याच्याच धर्माच्या आहेत.

४ ई. मुसलमान प्रथांविषयी न बोलता हिंदु धर्मातील प्रथांविषयी बोलणारे अभिनेते आमीर खान ! : दूरदर्शन वाहिनीवरील ‘सत्यमेव जयते ।’ या मालिकेमधून हिंदूंमधील काही वाईट प्रथा-परंपरा, रूढी यांवर स्वतःचे ज्ञान पाजळणारे अभिनेते आमीर खान मुसलमान धर्मातील तलाक, बालविवाह, बहुपत्नीत्व, बुरखा, हिजाब (मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र), खतना (मुसलमान मुलींचा केला जाणारा एक विधी) आदी प्रथा-परंपरांविषयी मात्र तोंडातून अवाक्षरही काढत नाही.

४ उ. कन्हैयाची हत्या करणार्‍या मुसलमानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नूपुर शर्मा यांच्या हत्येची धमकी देणे : उदयपूरच्या (राजस्थान) कन्हैया नावाच्या शिंप्यानेही (टेलरनेही) नूपुर शर्मा यांना पाठिंबा देणारी ‘पोस्ट’ समाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. तेव्हापासून त्याला कट्टर पंथियांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्याने याविषयी पोलिसांकडे तक्रार करूनही राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामतः २८ जून २०२२ या दिवशी तालिबानी वृत्तीच्या २ तरुणांनी कन्हैयाच्या दुकानात शिरून भरदिवसा त्याची चाकूने गळा चिरून हत्या केली. एवढेच नव्हे, तर या घटनेची मारेकर्‍यांनी एक ध्वनीचित्रफितही (व्हिडिओही) बनवून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली. त्यात त्यांनी हातात तलवार घेऊन स्वतःच्या गुन्ह्यांची संमती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली, तसेच त्यांनी ‘मोदी आणि नूपुर शर्मा यांचीही कन्हैयाप्रमाणे हत्या करू’, अशी उघड धमकीही दिली.

५. नूपुर शर्मा यांना मिळणार्‍या धमक्यांविषयी निधर्मीवादी आणि वृत्तवाहिन्या गप्प का ?

हिंदू आणि हिंदु धर्म, देवीदेवता, श्रद्धास्थाने यांचा सातत्याने अवमान करणारे मुसलमान नूपुर शर्माच्या एका विधानावरून मात्र पेटून उठतात. जगातील सर्व मुसलमानांकडून तिचा निषेध केला जातो, तिला मृत्यूदंड देण्याचे फतवे काढले जातात, तिच्यावर बलात्कार करण्याच्याही धमक्या दिल्या जातात; पण एरव्ही स्त्रियांच्या सन्मानाविषयी बोलणारे भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी नेते, विचारवंत, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या या नूपुर शर्मा यांना मिळणार्‍या धमक्यांविषयी मात्र मूग गिळून स्वस्थ बसल्या.

६. हिंदु कोणत्याही पक्षाचा असो, जिहादींच्या दृष्टीने तो काफीरच !

हा लेख लिहीत असतांनाच वृत्तपत्रात एक बातमी वाचण्यात आली. नूपुर शर्मा यांना धमकावणार्‍या आणि हिंदु देवतांवर अशोभनीय टिप्पणी करणार्‍यांवर कठोर अन् तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजस्थानमधील अजमेर शहरात हिंदूंकडून एक भव्य मोर्चा काढण्यात आला. यात सर्वसामान्य जनतेसह अनेक साधू-संत आणि भाजपच्या स्थानिक आमदार अनिता भदेल याही सहभागी झाल्या होत्या. मला अनेकदा प्रश्न पडतो की, हिंदू आणि हिंदुत्वाच्या बाजूने नेहमी केवळ भाजपचेच आमदार मैदानात का उतरतात ? इतर राजकीय पक्षांतील हिंदु नेत्यांना हिंदूंशी काही देणे-घेणे नाही का ? इतर राजकीय पक्षांतील हिंदु नेते काय केवळ मुसलमानांच्या मतांवरच निवडून येतात ? जिहादींच्या दृष्टीने हिंदु, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, तो काफीरच असतो. जिहादी जेव्हा आत्मघातकी आक्रमणे करतात, तेव्हा ते ‘समोरचा हिंदू या पक्षाचा कि त्या पक्षाचा ?’, असा विचार कधीच करत नाहीत.

७. मुसलमानांच्या तुष्टीकरणामुळे सामान्य जनतेला दुष्परिणाम भोगावे लागणे

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांच्या काळात राजकीय नेत्यांनी केवळ मतांच्या लालसेपायी मुसलमानांचे जे अतोनात तुष्टीकरण केले, त्याचे हे दुष्परिणाम नेत्यांना नव्हे, तर सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. ‘या तुष्टीकरणामुळे जिहादी वृत्तीच्या मुसलमानांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असून भारताचे तालिबानीकरण होत चालले आहे’, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ? या तालिबानीकरणामुळे एक दिवस तुष्टीकरण करणार्‍या नेत्यांचेही काही बरे-वाईट झाल्यास आश्चर्य ते काय ? हे वास्तव तुष्टीकरण करणार्‍या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे.

(क्रमश:)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ (१.१.२०२३)

संपादकीय भूमिका

  • धर्मांधांकडून हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांच्या केल्या जाणार्‍या अवमानाच्या विरोधात निधर्मीवादी काही बोलत का नाहीत ?
या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/647494.html