नवी देहली – केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. ‘अवामी कृती समिती’चे नेते मिरवाईज उमर फारूख आहेत आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’चे नेते मसरूर अब्बास अन्सारी आहेत.
१. गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या संघटना जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा कट रचत होत्या. त्यांच्यावर आतंकवादाला प्रोत्साहन देणे, भारतविरोधी घोषणा देणे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी लोकांना चिथावण्याचा आरोप आहे.
२. गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, या संघटना देशाचीा एकता आणि शांतता यांसाठी धोका आहेत. जो कुणी देशविरोधी कृत्य करील, त्याला सरकारकडून कठोर शिक्षा दिली जाईल.