आमदार मायकल लोबो यांचा गोवा सरकारला अजब सल्ला !

पणजी, १२ मार्च (वार्ता.) – सरकारी प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी सरकारने शाळांचे माध्यम इंग्रजी करावे, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कळंगुट येथील पुतळ्याला लोबो यांच्या हस्ते आदरांजली वहाण्यात आली. या वेळी ते पत्रकारांना म्हणाले, ‘‘पालक इंग्रजी माध्यमाला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे याचे परिणाम सरकारी प्राथमिक शाळांवर व्हायला लागले आहेत. हे असेच चालू राहिल्यास भाऊसाहेब बांदोडकर यांनी चालू केलेल्या शाळा भविष्यात पूर्णपणे बंद होतील. (भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा चालू केल्या. त्यामुळे गोव्यातील मंदिरांची संस्कृती टिकून आहे. त्यांचे माध्यम लोबो सांगतात त्याप्रमाणे इंग्रजी केल्यास पुढच्या पिढीला भजनांचा अर्थ, कीर्तन, अध्यात्म, छत्रपती शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास आदी काहीही समजणार नाही आणि संस्कृती लोप पावेल. – संपादक) त्यामुळे आता प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून करून मराठी किंवा कोकणी हा विषय सक्तीचा करण्याची विनंती मी सरकारकडे केली आहे. राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा बंद पडू लागल्याने सरकारने त्या चालवण्यासाठी अशासकीय संस्थांना दिल्या आहेत. हा निर्णय चुकीचा आहे. सरकारी शाळा केवळ मराठी आणि कोकणी या भाषांतून शिक्षण देत आहेत. गोमंतकीय मात्र त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत पाठवत आहेत.’’
प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमासंबंधी राज्याचे धोरण स्पष्ट आहे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाविषयी आमदार मायकल लोबो यांनी केलेल्या मागणीवर ‘प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमासंबंधी राज्याचे धोरण स्पष्ट आहे आणि या धोरणाची कार्यवाही चालू आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
संपादकीय भूमिका
|