धामपूर (उत्तरप्रदेश) – बिजनोर जिल्ह्यातील धामपूरमधील कुंदिपुराचे ग्रामप्रमुख निसार अहमद यांचा मुलगा आरिफ याने भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्यावर अश्लील टिपणी करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे.
आरिफने त्याच्या इंस्टाग्राम खाते ‘आरिफ डॉन, आतंकवादाचे दुसरे नाव’वरून एक ‘व्हिडिओ स्टेटस् अपलोड’ केला, ज्यामध्ये त्याने भगवान श्रीराम आणि सीतामाता यांचे छायाचित्र प्रसारित केले आहे आणि त्यांच्याविषयी अश्लील टिपण्या केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून गावकरी संतापले. त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून आरोपीच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
कुंदिपुरातील एक ग्रामस्थ विशेष राजपूत यांनी सांगितले की, ते इंस्टाग्रामवर पहात असतांना त्यांना कुंदिपुरा येथील या तरुणाचा व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये आरिफने देवतांविषयी अश्लील टिपणी केली होती. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, आरिफवर यापूर्वी चोरी, मारामारी आणि विनयभंग अशा आरोपांखाली गुन्हे नोंद आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर धामपूर पोलिसांनी आरिफच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमान अल्पसंख्याक उन्मत्तपणा जाणा ! मुसलमान वारंवार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करतात. मुसलमानांच्या हा उन्मत्तपणा साम्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना दिसत नाही. हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ठरली आहे ! |