सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीला अधिवेशनानंतर गती – बाबासाहेब पाटील, सहकारमंत्री

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनियमिततेसंदर्भात आरोप प्रकरणी विभागीय सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. तिने सखोल चौकशी करून १६ जून २०२३ या दिवशी अहवाल सादर केला. या अहवालानुसार बँकेने ‘नाबार्ड’च्या मार्गदर्शक सूचना, सहकार कायदा आणि बँकेच्या पोटनियमांचे उल्लंघन करून असुरक्षित कर्जवाटप केल्याचे निदर्शनास आले. बँकेवरील आरोपांसंदर्भात १५ कर्मचार्‍यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे, तसेच संचालक मंडळाने शासनाकडे प्रविष्ट केलेल्या अपिलास अनुसरून कलम ८८ अंतर्गत चौकशीला गती देण्यात येणार आहे. अधिवेशनानंतर वर्तमान परिस्थितीविषयी सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.