औरंगजेबावर स्तुतीस्तुमने उधळणारे अबू आझमी यांना अटकपूर्व जामीन संमत !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

मुंबई – क्रूरकर्मा आणि सहस्रो हिंदूंना ठार मारणार्‍या औरंगजेबावर स्तुतीस्तुमने उधळणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर मुंबईत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद झाले आहेत. तरी त्या संदर्भात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अबू आझमी यांनी अटकपूर्व जामीनासाठी आवेदन प्रविष्ट केले होते. यावर सत्र न्यायालयाने अबू आझमी यांना जामीन संमत करत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे; मात्र १२, १३ आणि १५ मार्चला अन्वेषण अधिकार्‍यांसमोर उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत. अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळी होती. यानंतर विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.