भाजपच्या वतीने अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

छत्रपती संभाजीराजे ‘धर्मवीर नव्हते’, या अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध

अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करतांना भाजपचे कार्यकर्ते

कोल्हापूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने येथे अजित पवार यांचा तीव्र निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या प्रसंगी अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी अजित ठाणेकर, सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, दिलीप मेत्राणी, अमोल पालोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, विजय आगरवाल, विवेक कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.