खरेदीची सक्ती करणार्‍या खत उत्पादक आस्थापनांवर कारवाई करू ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन

शंभूराज देसाई

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – खत उत्पादक आस्थापने खतांची विक्री करतांना त्यासमवेत अन्य खते विकत घेण्याची वितरकांवर सक्ती करतात. त्यामुळे वितरकांकडूनही शेतकर्‍यांवर ही सक्ती केली जाते. हे रोखण्यासाठी खरेदीची सक्ती करणार्‍या खत उत्पादक आस्थापनांवर कारवाई करण्याची चेतावणी मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारच्या वतीने विधानसभेत दिली.

बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खतांची पिशवी घेतांना शेतकर्‍यांना वेगळी खते घेण्यासाठी सक्ती करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली.
या प्रकरणात ‘मे. सागर सिड्स ॲन्ड फर्टिलायझर’ या खत विक्रेत्याचा परवाना रहित करण्यात आला होता, तो पुन्हा पुर्ववत् करण्यात आला आहे. बोगस खतांमुळेही आत्महत्या होत आहेत. बोगस खते आणि बोगस किटकनाशके यांची एकाच वर्षात २-३ वेळा होत असल्यास याविषयी पडताळून करून निलंबनाची कारवाई केली जाईल, असे या वेळी शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

संपादकीय भूमिका

परवाना रहित केलेल्या खत विक्रेता आस्थापनाचा परवाना परत पूर्ववत् केल्यावर त्याच्याकडून तोच गुन्हा परत होणार नाही, याची निश्चिती कोण देणार ?