बिहारमध्ये विवाहित महंमद इझहारने हिंदु नाव धारण करून हिंदु तरुणीची फसवणूक !

प्रतिकात्मक छायाचित्र

समस्तीपूर (बिहार) – येथील महंमद इझहार नावाच्या धर्मांधाने ‘राकेश’ नावाने सामाजिक संकतस्थळांवून बंगालमधील एका हिंदु तरुणीशी संपर्क केला. इझहार याने तिला ओलीस ठेवले होते आणि तो विवाह आणि धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता. २६ डिसेंबर २०२२ या दिवशी विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दलसिंग सराय रेल्वे स्थानकावर पीडितेची इझहारच्या तावडीतून सुटका केली.

१. समस्तीपूरमधील ताजपूरचा रहिवासी महंमद इजहार याने ‘राकेश’ या हिंदु नावाने पीडित मुलीशी ओळख करून तिला मे २०२२ मध्ये कोलकाता येथून समस्तीपूरला घेऊन आला. ‘राकेश मुसलमान आहे आणि त्याचा विवाह झाला असून तो २ मुलांचा बाप आहे’, हे तिला समजले. पीडित मुलीने घरी परतण्याचा आग्रह धरला तेव्हा इझहार याने तिला मारहाण केली.

२. पीडित मुलीने तिच्या आईला भ्रमणभाष करून इझहार याने तिला ओलीस ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कोलकाता पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

३. कोलकाता पोलिसांच्या माहितीवरून बिहारच्या ताजपूर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका करून पोलीस ठाण्यात ठेवले. पोलिसांकडून माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने समस्तीपूर गाठले. तेथे पोलिसांनी मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले.

४. पीडित मुलगी तिच्या आईसोबत कोलकाता येथे परतत असताना इझहार आणि त्याचे गुंड साथीदार यांनी तिला दलसिंह सराय रेल्वे स्थानकावर पुन्हा घेरले. तेव्हा विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट समजली. त्यांनी रेल्वे स्थानक गाठले आणि पीडित मुलगी आणि तिची आई यांची गुंडांच्या तावडीतून सुटका केली.