धुळे शहरातील महिंदळे शिवारात वीज वितरण आस्थापनातील कर्मचारी वीजदेयकांची थकबाकी मागण्यासाठी गेले होते. त्या वेळी धर्मांधांनी त्यांच्याकडे थकबाकी मागू नये, तसेच वीजपुरवठा खंडित करू नये; म्हणून शासकीय कर्मचार्यांना शिवीगाळ करून मारहाण करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ऐकल्यानंतर ‘आपण हिंदुबहूल भारतात आहोत कि पाकिस्तानमध्ये ?’, असा विचार येतो. वीजदेयक भरणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. असे असतांना वेळेत वीजदेयक न भरल्यामुळे वसुलीसाठी आलेल्या अधिकार्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागतो आणि तोही धर्मांधांमुळे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?
अशा प्रकारे धमकी देऊन हे धर्मांध स्वतःला कायद्याचे भय नाही, हेच दाखवून देत आहेत. धर्मांधांची ही घातक मानसिकता आताच ठेचली नाही, तर उद्या देशामध्ये अराजक माजण्यास वेळ लागणार नाही. जनतेच्या कराच्या पैशातून सामान्य जनतेला सर्व मूलभूत सोयीसुविधा दिल्या जातात. दिलेल्या सुविधांचा कर न भरल्यास जनतेला सातत्याने सुविधा पुरवता येण्यात अडचण निर्माण होणार. एखादा गट अशा प्रकारे वागत असेल, तर त्याचा परिणाम जनतेवर पर्यायाने देशावर होणार हे नक्की ! स्वतःची चूक असतांनाही दमदाटी करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना ही मानसिकता पालटणे अशक्य आहे.
भारतामध्ये धर्मांध अशा प्रकारे वागण्याचे धाडस कुणाच्या जोरावर करत आहेत ? हेही पहायला हवे. प्रत्येक शहरामध्ये अशा प्रकारचा संवेदनशील भाग आहे, जेथे जाऊन थकबाकी वसूल करायला किंवा कारवाई करायला शासकीय कर्मचारी घाबरतात; कारण त्या भागात जाऊन कारवाई करणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे आहे. या परिस्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत.
काही राज्यांमध्ये तर मतांसाठी तेथील स्थानिक सरकार जनतेला वीज, पाणी विनामूल्य देण्याचे आश्वासन देत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्ये कर्जबाजारी होत आहेत. परिणामी त्या कर्जाचा भार देशावर पडत आहे. अशी फुकट खाण्याची सवय जनतेला लावली, तर देश दिवाळखोरीकडे जायला वेळ लागणार नाही. या एका उदाहरणातून धर्मांध देशामध्ये कशा प्रकारे वागत आहेत, याचा अंदाज येतो. ही मानसिकता लक्षात घेऊन याला सरकारने वेळीच कठोरपणे आवर घालावा, हीच अपेक्षा !
– श्री. जयेश बोरसे, पुणे