प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांना बाँबने उडवण्याची धमकी !

हिंदु नाव सांगून मुसलमानांच्या विरुद्ध न बोलण्याची चेतावणी !

ओवैसी आणि आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर महाराज

नवी मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – ‘ओवैसी आणि मुसलमान यांच्या विरुद्ध बोलल्यास तुम्हाला बाँबने उडवून देऊ’, अशी धमकी प्रसिद्ध कथाकार आणि आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर महाराज यांना खारघर येथे कार्यक्रमाच्या मिळाळी आली आहे. दिनेश असे हिंदु नाव सांगून दुबई येथून ही धमकी दिल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर महाराजांच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांना अनेकदा अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. एप्रिलमध्येही अमरावती पोलीस ठाण्यात अशा प्रकारची धमकी मिळाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, उत्तरप्रदेशमधील शांती सेवाधामचे आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर महाराज यांचा २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानात भागवतकथेचा कार्यक्रम चालू आहे. २४ डिसेंबर या दिवशी सकाळी त्यांना अत्यंत अश्‍लाघ्य भाषेत शिवीगाळ करत ‘मोदी आणि योगी यांची गुलामी सोड’ असेही धमकावण्यात आले. त्यामुळे ‘पोलिसांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन त्वरित कारवाई करावी’, अशी मागणी शांती सेवाधाम संस्थेचे सचिव विजय शर्मा यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंचे संत-महंत, साधू, पुजारी आणि कथाकार यांना संपवण्याचा कट रचला जात आहे, हे पुन्हा एका समोर आले आहे. अशी धमकी देणार्‍यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !