चीन आता कोरोनाची रुग्णसंख्या घोषित करणार नाही !

प्रतिकात्मक छायाचित्र

बीजिंग (चीन) – चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने देशातील कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी घोषित करण्यात येणार नाही, असे सांगितले आहे. गेल्या ३ वर्षांपासून आयोगाकडून याविषयीची आकडेवारी घोषित करण्यात येत होती. नुकतेच आयोगाने गेल्या २० दिवसांत चीनमध्ये २५ कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे घोषित केले होते. आता आकडेवारी घोषित न करण्याचे कारण आयोगाने स्पष्ट केलेले नाही.

संपादकीय भूमिका

  • चीन आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत लपवाछपवी करत आल्याने त्याने अशा प्रकारचा निर्णय घेणे आश्‍चर्यजनक नाही !