इंदूर (मध्यप्रदेश) येथे २४ घंट्यांत ‘लव्ह-जिहाद’ची ३ प्रकरणे उजेडात !

प्रतिकात्मक छायाचित्र

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशात एकीकडे सरकार ‘लव्ह जिहाद’ आणि बलपूर्वक धर्मांतर यांविषयी कठोर कायदे करत असतांना दुसरीकडे असे प्रकार मात्र वाढतच आहेत. गेल्या २४ घंट्यांत इंदूरमध्ये ‘लव्ह जिहाद’ची ३ प्रकरणे समोर आली आहेत, तर गेल्या ६ दिवसांतील हे पाचवे प्रकरण आहे.

१. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संयोगितागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘ट्रॅफिक पार्क’मधून एका तरुणाला हिंदु तरुणीसह पकडले. त्यांनी त्या तरुणाचे आधारकार्ड जप्त केले. आधारकार्डमध्ये त्याचे नाव ‘अरबाज खान’ असे लिहिले होते. त्या तरुणाचे वास्तव समोर आल्यानंतर मुलीलाही धक्का बसला. ‘आजवर तो ‘अज्जू’ असे हिंदु नाव धारण करून मला भेटत असे’, असे पीडित मुलीने कार्यकर्त्यांना सांगितले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. अरबाज खान ‘लव्ह जिहाद’चा आरोपी असल्याचे बजरंग दलाने सांगितले. त्याला हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

२. यापर्वी अखलाक उर्फ अर्जुनला नेहरू मैदानाच्या परिसरातून अटक करण्यात आली होते. लव्ह जिहादच्या अन्य एका प्रकणात राजेंद्रनगर येथील प्रादेशिक उद्यानातील आफताब खान यालाही अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहादच्या विरोधात केवळ कायदाच नव्हे, तर धर्मांध युवकांचे हिंदु युवतींकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धारिष्ट्य होणार नाही अशी वचक निर्माण करणे आवश्यक !