चीनमध्ये प्रतिदिन आढळतात कोरोनाचे १० लाख रुग्ण !

अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत २० दिवसांची प्रतीक्षा !

बीजिंग (चीन) – चीनमध्ये प्रतिदिन १० लाख कोरोनाचे रुग्ण आढळत असून  प्रतिदिन स्रहस्रो लोकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा याहीपेक्षा पुष्कळ अधिक असल्याचे सांगितले जात आहे. तेथे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत २० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असून सामूहिक अंत्यसंस्कार केले जात आहेत. चिनी रुग्णालयांमध्ये खाटा अपुर्‍या पडत आहेत. कोरोनाची हाताबाहेर जाणारी परिस्थिती पहाता चीन सरकारने पुन्हा एकदा देशाच्या सीमा बंद करण्यास आरंभ केला आहे.

जपानमध्ये ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत ४१ मुलांचा मृत्यू

जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, जपानमध्ये कोरोनाची ८वी लाट आली असून ओमिक्रॉनच्या उपप्रकारामुळे बालकांचा मृत्यू होत आहे. तेथे ४१ मुलांना जीव गमवावा लागला आहे.

अमेरिकेत बाधितांची संख्या १० कोटींच्या पुढे

अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’च्या अहवालानुसार, अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या १० कोटींच्या पुढे गेली आहे. येथे ओमिक्रॉनचा नवीन उपप्रकार बीएफ.७  हा कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य कारण आहे.