कानपूर येथे हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर, तर प्रयागराज येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार !

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ची दोनी नवीन प्रकरणे उघड !

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातून ‘लव्ह जिहाद’ची २ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कानपूरमधील एका हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला पळवून नेणार्‍या महंमद वकार याला कानपूर पोलिसांनी नुकतीच अटक केली. दुसरीकडे प्रयागराजमध्ये काही धर्मांध तरुणांनी एका हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

१. पहिल्या घटनेत कानपूर येथील आझादनगर येथे रहाणार्‍या एका हिंदु व्यक्तीने, ‘शिकवणीवर्गाला गेलेली माझी मुलगी घरी परतलीच नाही’, अशी पोलिसांत तक्रार केली.  पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे महंमद वकार याचा शोध चालू केला. त्याला मध्यप्रदेशातील धार येथून अटक करण्यात आली. त्याने मुलीचे धर्मांतर करून तिला गुजरातमधील सूरत येथे विवाह करण्यासाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले.

२. प्रयागराज येथील ३५ वर्षीय हिंदु महिलेने तिच्या फेसबुक मित्राच्या विरोधात झुंसी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पीडितेने, ‘माझ्या एका फेसबुक मित्राने हिंदु नाव धारण करून माझ्याशी मैत्री केली. काही दिवसांनी या मुसलमानाने मला दुसर्‍या शहरात फिरायला नेले. तेथे या मुसलमानाचे अनेक मित्र आधीच तेथे उपस्थित होते. या सर्वांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. या वेळी त्यांनी माझा अश्‍लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर माझा व्हिडिओ ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत माझ्यावर दबाव आणणे चालू केले. या मुसलमानाने माझ्याशी विवाह करण्याचे आश्‍वासन दिले आणि त्याच्या घरी नेले. तेथे मुसलमानाच्या भावानेही माझ्यावर बलात्कार केला’, असे तक्रारीत म्हटले आहे.