सहनशील, हसतमुख आणि दुसर्‍यांना आनंद देणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अवनी सुहास पवार (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. अवनी पवार ही या पिढीतील आहे !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष त्रयोदशी (२१.१२.२०२२) या दिवशी पुणे येथील चि. अवनी पवार हिचा द्वितीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

चि. अवनी पवार

चि. अवनी सुहास पवार हिला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

  • पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवल
  • सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. सुप्रिया सुहास पवार (चि. अवनीची आई), पुणे

१ अ. गर्भधारणेपूर्वी

सौ. सुप्रिया पवार

१ अ १. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील दैवी बालसाधकांचे लेख वाचून ‘आपल्या बाळामध्येही हे दैवी गुण यावेत’, असा विचार येणे : ‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील दैवी बालसाधकांचे लेख वाचत असे. तेव्हा माझ्या मनात ‘माझ्या बाळामध्येही हे दैवी गुण यावेत’, असा विचार यायचा. माझी आई (सौ. कमल निघोट) गुरुकृपायोगानुसार साधना करत असल्यामुळे मला साधनेविषयी ठाऊक होते. मी लग्नाआधी थोडी सेवा करत असे.

१ अ २. गर्भधारणेच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर यांचे लेख मी आवर्जून वाचत होते. त्यानंतर २ – ३ दिवस मला स्वप्नात, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, पू. वामन आणि एक बाळ दिसत होते. ते दोघे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत खेळतांना दिसत होते.’ त्यानंतर २ – ३ दिवसांनी ‘मला गर्भधारणा झाली आहे’, असे समजले.

१ आ. गर्भारपणात जाणवलेली सूत्रे

१. गर्भधारणा झाल्यावर चौथ्या मासात मला कोरोना झाला होता. तेव्हा १५ ते २० दिवस मला काहीच खाता येत नव्हते आणि चालताही येत नव्हते. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना करायचे, ‘गुरुदेव, तुम्हीच मला शक्ती द्या आणि बाळाला सुरक्षित ठेवा.’ या प्रसंगातून मी आणि बाळ सुखरूप बाहेर पडलो. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला गर्भारपणात कोणताही त्रास झाला नाही.

२. मी नामजप करत असतांना ‘बाळही माझ्या समवेत नामजप करत आहे आणि त्याची पुष्कळ हालचाल होत आहे’, असे मला जाणवायचे.

१ इ. गर्भारपणात केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि सेवा

१. मी पोटाला नियमित अत्तर आणि कापूर लावत असे. तेव्हा ‘बाळालाही चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवायचे.

२. मी प्रतिदिन नियमित श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्रीमारुतिस्तोत्र म्हणत असे. प्रतिदिन आरती आणि नामजपादी आध्यात्मिक उपायही करत असे.

३. मी नियमित राष्ट्रीय भावसत्संग ऐकत असे.

१ ई. प्रसूती : मला बाळाच्या जन्माच्या वेळी नैसर्गिक प्रसूतीसाठी पुष्कळ त्रास सहन करवा लागला. एवढा त्रास मी गुरुदेवांच्या कृपेने सहन करू शकले. शेवटी माझे शस्त्रकर्म करावे लागले आणि मला मुलगी झाली.

१ ई. जन्म ते १ मास

१. आम्ही बाळाचे नाव अवनी ठेवले. ती १ मासाची असतांना आमच्या बोलण्याला प्रतिसाद द्यायची. तेव्हा ‘आम्ही बोललेले तिला समजते’, असे आमच्या लक्षात आले.

२. माझ्या सासूबाई तिची प्रतिदिन दृष्ट काढत असत. त्या सायंकाळी ६ वाजता दूरदर्शनवर कीर्तन लावत असत. तेव्हा ती पूर्ण कीर्तन ऐकत असे. कीर्तनात टाळ वाजला की, ती ही हाताने तशी कृती करण्याचा प्रयत्न करायची.

३. तिला ‘इंजेक्शन’ दिल्यावर त्याचा तिला कधीही त्रास झाला नाही. ती आजारी पडली, तरी कधीच रडत नाही.

४. मी साधनेविषयी सत्संग ऐकत असतांना ती शांत रहाते आणि झोपी जाते.

१ उ. स्वभावदोष : हट्टीपणा आणि राग येणे.’

२. सौ. कमल निघोट (अवनीची आजी (आईची आई)), राजगुरुनगर, पुणे.

सौ. कमल निघोट

अ. ‘अवनी सतत हसतमुख असते. तिच्या सहवासात राहिल्यावर पुष्कळ आनंद मिळतो.

आ. तिच्या समवेत असतांना मनामध्ये कोणतेच विचार येत नाहीत.

इ. ती ३ – ४ मासांची असल्यापासूनच तिला ‘प.पू. गुरुदेव (प.पू. आबा) कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर ती गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहाते किंवा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे बोट दाखवते.’

सर्व सूत्रांसाठी दिनांक (३.९.२०२२)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.