मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाच्या आईची तरुणीच्या भावांकडून हत्या

देहली – येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाच्या आईची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गीता शर्मा असे या महिलेचे नाव आहे. त्या ५५ वर्षांच्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचा भाऊ आणि त्याचे सहकारी यांना अटक केली. आमीर, नावेद, सलमान आणि अमन अशी त्यांची नावे आहेत.

वर्षभरापूर्वी गीता शर्मा यांचा मुलगा दीपक याने मुसलमान तरुणी सितारा हिच्याशी विवाह केला होता. यामुळे दोघांच्या कुटुंबातील सदस्य अप्रसन्न होते. काही दिवसांनी दोघांनीही हा विवाह मान्य केला. त्यानंतर सितारा माहेरीही जाऊ लागली होती. सितारा माहेरहून काही दागिने घेऊन गेल्याने तिचे भाऊ चिडले होते. त्यातून ते दीपकच्या घरी गेले. त्या वेळी दीपक घरी नसल्याने त्यांनी तिच्या आईवर गोळ्या झाडल्या.

संपादकीय भूमिका

हिंदु तरुणींना लव्ह जिहादद्वारे फसवून त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणार्‍या मुसलमान तरुणांशी हिंदू कधी असे वागत नाहीत; मात्र मुसलमान तरुणीशी हिंदु तरुणाने विवाह केल्यावर अशा घटना घडतात, हे लक्षात घ्या !