अलीगढ (उत्तरप्रदेश) – येथील अलीगढ मुस्लिम विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांनी बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला. या वेळी त्यांनी ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील’, अशा शब्दांत धमकी दिली. यासह या विद्यार्थ्यांनी ‘बाबरी मशीद होती, आहे आणि भविष्यातही राहील’, अशाही घोषणा दिल्या.
‘यह जमीन अल्लाह की… यहाँ से सभी बुत (मूर्तियाँ) उठवा दी जाएँगी’: अलीगढ़ यूनिवर्सिटी में लगे नारे-पोस्टर… चुनावी नतीजों के बीच भुला दी गई खबर#AMU https://t.co/2Nip8Kt9BZ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 8, 2022
६ डिसेंबर २०२२ या दिवशी विद्यापिठाचा विद्यार्थी नेता महंमद फरीद याच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मुसलमान विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. या वेळी तो म्हणाला, ‘‘बाबरी मशीद कधीच संपुष्टात येणार नाही आणि ती कायम राहील. एक दिवस अल्लाहच्या या भूमीतून सर्व मूर्ती हटवल्या जातील आणि केवळ अल्लाचे नाव राहील.’’
पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण करावे ! – भाजप
याविषयी अलीगड येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव शर्मा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ साजरा करण्यावर बंदी घातली आहे. यानंतरही अलीगढ विद्यापिठात हा दिवस साजरा करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण केले पाहिजे.
संपादकीय भूमिका
|