उत्तराखंड येथील नेपाळ सीमेवर नेपाळी लोकांकडून भारतीय कामगारांवर दगडफेक

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड येथे नेपाळच्या सीमेवर काली नदीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याला नेपाळी लोकांकडून विरोध केला जात आहे. यामुळेच त्यांच्याकडून बंधारा बांधणार्‍या भारतीय कामगारांवर दगडफेक करण्यात आली. यात अनेक कामगार घायाळ झाले.

या वेळी नेपाळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले, तर भारताच्या बाजूने सशस्त्र सुरक्षा बलाच्या सैनिकांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या येथे तणावाची स्थिती आहे.