महाराष्ट्रात योग्य वेळी समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – राज्यघटनेने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळीच राज्ये समान नागरी कायदा लागू करतील, असे मला वाटते. महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘गोवा राज्यात समान नागरी कायदा आहे. उत्तराखंड येथेही समान नागरी कायदा लागू करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात ही राज्येही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. महाराष्ट्रही योग्य वेळी हा कायदा लागू करण्याविषयी विचार करेल.’’