उत्तरप्रदेशमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणार्‍या सुहेल याला अटक

पीडितेला कह्यात घेताना पोलीस (डावीकडे) आरोपी सुहेल (उजवीकडे)

बागपत (उत्तरप्रदेश) – अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून नेल्याच्या प्रकरणी पोलिसांनी सुहेल याला अटक केली. २३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी पीडित मुलीच्या वडिलांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली होती. ‘सकाळी ७.३० च्या सुमारास माझ्या पत्नीने मुलीला शाळेत सोडले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका घंट्यानंतर दूरध्वनी करून माझी मुलगी न कळवता शाळेतून निघून गेली’, असे कळवले’, अशी माहिती पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले होते.

या घटनेमागे सुहेल असल्याची माहिती बागपत पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुहेलला कह्यात घेऊन अन्वेषण चालू केले. सुहेलने गुन्ह्याची स्वीकृती दिली आणि पीडितेचे ठिकाण पोलिसांना कळवले. पोलिसांनी पीडितेला जंगलातील शेतातून कह्यात घेतले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, असे पोलीस अधीक्षक नीरज जदौन यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

एरव्ही समाजात अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !