भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदु होते ! – गुलाम गौस, आमदार, जनता दल (संयुक्त)

जनता दल (संयुक्त) पक्षाचे विधान परिषदेतील आमदार गुलाम गौस

पाटलीपुत्र (बिहार) – भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदु होते. ब्राह्मणवादी व्यवस्थेमुळे लोकांनी इस्लामचा स्वीकार केला; कारण ब्राह्मणवादी नीतीमुळे लोक पीडित होते, असे विधान जनता दल (संयुक्त) पक्षाचे विधान परिषदेतील आमदार गुलाम गौस यांनी परिषदेतील एका कार्यक्रमात केले. (गौस यांनी अर्धसत्य सांगितले आहे. भारतातील मुसलमान पूर्वी हिंदु होते, हे सत्य आहे; मात्र ब्राह्मणांमुळे ते मुसलमान झाले नाहीत, तर त्यांना मोगल आणि अन्य इस्लामी शासनकर्ते यांनी बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते, हे उर्वरित सत्य आहे. गौस जाणीवपूर्वक हे लपवून ‘हिंदूंच्या धर्मांतराला हिंदूच उत्तरदायी आहेत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक)  या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ‘पंतप्रधान मोदी यांनी मुसलमानांसाठी काहीतरी करण्यासाठी सांगितले आहे, यामुळेच ते कौतुकास पात्र आहेत. आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी गरीब, मागासवर्गीय, दलित आणि मुसलमान यांच्याविषयी काही केले नाही.’

गुलाम गौस पुढे म्हणाले की, जर दलित आणि मागासवर्गीय यांना सुविधा दिल्या गेल्या, तर ते अन्य धर्मामध्ये जाणार नाहीत. (अन्य धर्मांत जाणारे आमिषामुळे आणि दबावामुळे जातात, हे गौस यांना ठाऊक नाही का ? – संपादक) काही लोकांसाठी खुर्ची धोक्यात असू शकते; मात्र इस्लाम, हिंदुत्व आणि देश कधी धोक्यात असणार नाही.

संपादकीय भूमिका

जर हे सत्य गुलाम गौस यांना मान्य आहे, तर ते या मुसलमानांना त्यांच्या पूर्वीच्या हिंदु धर्मात येण्यास का सांगत नाहीत ? ते गुलामगिरीचे जीवन का जगत आहेत?, हे गौस स्वतःला आणि अन्य मुसलमानांना का विचारत नाहीत ?