सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लाभलेल्या सत्संगात त्यांचे मानस पाद्यपूजन करण्याचा विचार आल्यावर त्यांनी त्यांचे दोन्ही चरण शेजारी ठेवणे
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांचे दर्शन होताच माझा भाव जागृत झाला. ते आसनस्थ झाल्यावर त्यांचे डावे चरण पुढे आणि उजवे चरण मागे होते. देवानेच माझ्याकडून त्यांचे मानस पाद्यपूजन करून घेतले. मी त्यांच्या पुढे असलेल्या डाव्या चरणावर स्वस्तिक काढले. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘मी त्यांच्या उजव्या चरणावर कसे स्वस्तिक काढणार ?’
माझ्या मनात हा विचार येताक्षणीच जणू त्यांनी माझ्या मनातील विचार जाणून हळूच त्यांचे उजवे चरण डाव्या चरणाशेजारी ठेवले. अशा प्रकारे त्यांनी दोन्ही चरण समोर ठेवून माझ्याकडून त्यांच्या चरणांवर मानस स्वस्तिक काढून घेतले.
२. मला त्यांचे चरण गुलाबी दिसत होते.
३. त्यांच्या पायांच्या अंगठ्यांची १ – २ वेळा हालचाल झाली. तेव्हा मला आतून शांती अनुभवता आली.
मला ही अनुभूती दिल्याबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– सौ. सुचेता सुरेश नाईक, ढवळी, फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |