जर हिंदु धर्मीय एक विवाह करतात, तर अन्य धर्मियांनीही एक विवाह केला पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

कर्णावती (गुजरात) – तुम्ही २-३ विवाह का म्हणून करत आहात ? जर हिंदु एक विवाह करतो, तर अन्य धर्मियांनाही एकच विवाह करावा लागेल. देशात समान नागरी कायदा झाला पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केले. भाजपने गुजरातमध्ये समान नागरी कायदा बनवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

लव्ह जिहादविरोधी कायदा झाला पाहिजे !

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, देहलीमध्ये आफताब नावाच्या मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीची हत्या करून तिचे ३५ तुकडे केले. त्याने या तरुणीशी विवाह करण्याचे आश्‍वासन देऊन असे केले. तो अन्य तरुणींशीही मैत्री करत होता. देशात अनेक आफताब असल्याने लव्ह जिहादविरोधी कायदा केला पाहिजे.